सातारा प्रतिनिधी । पावसाळ्यात चारचाकी वाहनांच्या अपघाताच्या घटना नेहमी घडतात. अशा घटनांमागे काहींना काही कारण हे नक्कीच असते. अशीच अंगावर थरकाप उडवणारी घटना सातारा शहरातील राजवाडा बस स्थानकावर घडली आहे. या ठिकाणी कर्नाटक राज्यातील बस चालक बसस्थानकाच्या उताऱ्यावर बस उभी करून चहा पिण्यासाठी गेला असता बस उताऱ्यास लागल्याने थेट स्थानकासमाेर रिक्षावर जाऊन आदळल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेमध्ये दाेन रिक्षांचा अक्षरशः चूराडा झाला असून एक रिक्षातील रिक्षा चालक जखमी झाला आहे.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, साताऱ्यातील राजवाडा बस स्थानकावर कर्नाटक राज्याची बस उभी हाेती. सकाळची वेळ असल्यामुळे फारस कोणी बसमध्ये बसत नसल्याचे पाहून बस तशीच चालू ठेऊन बसचालक चहा पिण्यासाठी गेला होता. यावेळी अचानक बसचा हॅन्ड ब्रेक फेल झाल्याने बस उताऱ्यावर येऊन पुढे गेली.
यावेळी बसस्थानकाच्या बाहेरील रिक्षा थांब्यावर नेहमीप्रमाणे काही रिक्षांच्या रांगा लागल्या हाेत्या. या बसने दाेन रिक्षांना धडक दिली. त्यामध्ये दाेन्ही रिक्षांचा चूराडा झाला. हा घडलेला अप्रकार पाहताच बस चालकासह इतर नागरिकांनी तात्काळ बसच्या दिशेने धाव घेतली. दरम्यान, बस चालकाने बसमध्ये चढून ब्रेक दाबला. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.
सकाळी सकाळी ‘तो’ ST बस तशीच सुरु ठेवून गेला चहा प्यायला; अन् पुढं घडलं असं काही… pic.twitter.com/KV4BDBvZcw
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 22, 2023
या अचानक घडलेल्या घटनेमुळे त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरीकांचा संताप अनावर झाला. संतापलेलया नागरिकांच्या जमावाने बस तशीच सोडून गेलेल्या बस चालक ऐवजी दुसऱ्याच कर्नाटक गाडीच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरला मारहाण केली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसाणी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच सातारा पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.