कराडात कारगिल शौर्य दिन साजरा; विजय दिवस चौकात स्मृतीस्तंभाला अभिवादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धामध्ये भारताने विजय संपादन केले. या विजयाप्रित्यर्थ हा दिवस ‘कारगिल शौर्य दिन’ म्हणून कराड येथे साजरा केला जातो. आज बुधवारी सकाळी येथील विजय दिवस चौकात विजय दिवस समारोह समिती व त्रिशक्ती फाउंडेशन यांच्या वतीने कारगिल शौर्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी विजय दिवस चौकात असणाऱ्या विजयस्तंभाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

यावेळी कराड येथील विजय दिवस चौकात सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाच्या NCC विद्यार्थ्यांच्या पथकाने सुरुवातीला मानवंदना दिली. त्यानंतर माजी नगरसेवक सौरभ पाटील, विजय दिवस समारोह समितीचे सहसचिव विलास जाधव, प्रा. बी. एस. खोत, सलीम मुजावर, रत्नाकर शानबाग, कॅप्टन बी जी जाधव यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी प्राचार्य गणपतराव कणसे, चंद्रकांत जाधव , सागर बर्गे,चंद्रशेखर दोडमणी,प्रमोद हिंगमिरे,राजू अपीने, भैया अरबुणे, सतीश बेडके, दिनकर थोरात, युवराज मस्के,साधना राजमाने,रोहिणी चव्हाण यांच्यासह तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान ‘कारगिल शौर्य दिनानिमित्त विजय दिवस चौकात स्मृतिस्तंभाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. NCC च्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिल्यानंतर ‘भारत माता की जय’ ‘जय जवान जय किसान’,’ वंदे मातरम ‘,’शहीद जवान अमर रहे’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.