कराड प्रतिनिधी | शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने १९ वे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन आज (शुक्रवार) सायंकाळी कराड तालुक्यातील २० प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते दिमाखात औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यामध्ये प्रथमच महिला शेतकऱ्याचा समावेश होता. व सर्व शेतकऱ्यांना मानाचे फेटे बांधण्यात आले होते. प्रारंभी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, (स्व.) यशवंतराव चव्हाण व विलासराव पाटील – उंडाळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रगतशील शेतकऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून फित कपण्यात आली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, तहसीलदार कल्पना ढवळे, उपविभागीय कृषी अधिकारी समीर पवार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, संचालक संभाजी चव्हाण, राजेंद्र चव्हाण,नितीन ढापरे,शंकरराव उर्फ सतीश इंगवले, सर्जेराव गुरव, विजयकुमार कदम, जयंतीलाल पटेल, जगन्नाथ लावंड, गणपत पाटील, प्रभारी सचिव आबासाहेब पाटील, माजी सभापती आप्पासाहेब गरुड, कोयना दूध संघाचे माजी अध्यक्ष वसंतराव जगदाळे, संपतराव इंगवले, निवासराव निकम, कराड तालुका खरेदी – विक्री संघाचे माजी चेअरमन हणमंतराव चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सर्जेराव लोकरे, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक जयवंतराव थोरात, कराड तालुका खरेदी – विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, व्हाईस चेअरमन जे. डी. मोरे, कोयना सहकारी बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, कोयना दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई, व्हाईस चेअरमन शिवाजीराव जाधव, फलटणच्या यशवंत सहकारी बँकेचे अध्यक्ष महेशकुमार जाधव, स्वा. सै. शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे यांच्यासह विविध संस्थातील पदाधिकारी उपस्थित होते.
‘या’ प्रगतीशिल शेतकऱ्यांनी कापली उद्घाटनाची फित
यावेळी संजय तवटे (कासारशिरंबे), सचिन जाधव (कोळेवाडी), अवधूत शिंदे (कार्वे), धोंडीराम मोरे (कापील), लक्ष्मण पाटील (कोरेगाव), संदीप पाटील (जखिणवाडी), सौ. पुष्पा पाटील (केसे), तुकाराम डूबल (म्होप्रे), बाळासाहेब शिंदे (तांबवे), पांडुरंग सावंत (अंधारवाडी), शिवराज पाटील (पाल), विद्याधर चव्हाण (कोपर्डे हवेली), अर्जुन माने (किल्ले सदाशिवगड), अतुल देशमुख (गोवारे), महेश शिंदे (विरवडे), अर्जुन पाटील व विश्वास मांडवे (कराड), राहुल थोरात (सवादे) आदी शेतकऱ्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.