कराडचे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर औंधकर यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर औंधकर यांचे आज मंगळवारी सकाळच्या सुमारास दुःखद निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी आषाढी एकादशी दिवशी त्यांचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.

एक बालरोग तज्ञ म्हणून ओळख असलेल्या डॉ. चंद्रशेखर औंधकर यांनी कराडसह परिसरातील तालुक्यातील ग्रामीण भागातून उपचारासाठी येणाऱ्या हजारो बालकांवर उत्तम रीतीने उपचार केले होते. अगदी मनमिळाऊ स्वभाव असलेल्या डॉ. औंधकरांनी अनेक सामाजिक कार्यात सहभागही घेतला.

कराड येथील चैतन्य हॉस्पिटलचे डायरेक्टर असलेल्या डॉ. औंधकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते. सोमवारी कालपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. दरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. डॉ. चंद्रशेखर औंधकर यांच्या पश्चात डॉ. पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. आज सायंकाळी 5:30 ते 7 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी औंधकर हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्यावर कराड येथील वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.