कराड प्रतिनिधी । कराडचे यशवंत कृषी प्रदर्शन राज्यातील कृषी व तंत्रज्ञानाला दिशा देणारे ठरले आहे. या प्रदर्शनाची उदात्त हेतूने विलासराव पाटील – उंडाळकर यांनी पायाभरणी केली. त्यांचा आदर्श घेवून हे प्रदर्शन दिवससेंदिवस बहरत चालले आहे, असे सांगून या माध्यमातून कृषी क्षेत्रातील नवी संकल्पना राबवली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा व कृषी विकासाचा मूळ हेतू घेऊन प्रदर्शन चालवण्याची परंपरा टिकावी व यातून शेतकरी समृध्द व्हावा, असे मत सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील यांनी केले.
कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 19 व्या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन 2024 चे उदघाटन राज्यसभेचे खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करा उत्तर विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार मनोज घोरपडे होते. यावेळी प्रमुख अतिथी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, रयत सह. साखर कारखानाचे चेअरमन श्री. उदयसिह पाटील-उंडाळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, कराड ख.वि.सह.संघ चेअरमन अनिल मोहिते, चेअरमन रोहित पाटील, जिल्हा अधीक्षक भाग्यश्री फरांदे, कराड तहसीलदार कल्पना ढवळे, सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, मनोहर शिंदे यांच्यासह शेतकरी, बाजार समिती संचालक कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
खा. नितीन पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण व किसन वीर यांचा खरा आदर्श विलासराव पाटील यांनी जपला. जिल्हा बँकेच्या विकासाची पायाभरणी जुन्या जाणत्या लोकांनी केली. यामध्ये विलासकाकांचे योगदान विसरता येत नाही. रयत कारखाना कर्जमुक्त झाला आहे. कराडची बाजार समिती जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. विलासकाका काकांच्या इतकी राजकारणातील उंची गाठावी, याकरिता अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांना सर्वांना हात द्यावा.
श्रीनिवास पाटील म्हणाले, विलासराव पाटील – उंडाळकर हे कायम टिकावू काम करत होते. लोकांचे पोट भरण्यासाठी दिवसभर राबणारा शेतकरी राजाला नवीन काहीतरी बघता यावे, याकरिता विलासराव पाटील – उंडाळकर यांनी प्रदर्शन सुरू केले.
आ. मनोज घोरपडे म्हणाले, कराडला राज्यातील आदर्शवत प्रदर्शन भरत आहे. शेतीमध्ये नोकरी व व्यवसायाच्या संधी आहेत. प्रदर्शनातून प्रत्येकाला नवे ज्ञान मिळते. चांगल्या विचाराकडे तालुक्यातील संस्था असल्याने शेतकऱ्यांचे हक्क अबाधित आहेत. अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर म्हणाले, कराड बाजार समितीच्या विकासासाठी विलासकाकांनी कसोशीने प्रयत्न केले. या संस्थेचे कामकाज समाजाभिमुख व शेतकऱ्यांच्या हितासाठी ठेवण्याचा विलासकाकांनी दंडक घातला आहे. बाजार समितीचा धान्य बाजाराचा व्यापार लवकरच सुरू होईल.
प्रास्ताविकात प्रकाश पाटील म्हणाले, विलासराव पाटील – उंडाळकर यांनी यशवंत विचार खऱ्या अर्थाने रुजवला. त्यांनी यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचे आयोजन सुरू केले. उत्तरोत्तर प्रदर्शनाची प्रगती झाली आहे. यातून प्रेरणा घेवून राज्यात इतर ठिकाणी कृषी प्रदर्शने सुरू झाली. मुंबई पाठोपाठ कराड मार्केटचे दर तेजीत असतात. यामागे विलासकाकांचे अथक परिश्रम आहेत. प्रकाश पाटील, संभाजी काकडे, विजयकुमार कदम, नितीन ढापरे, राजेंद्र चव्हाण, संभाजी चव्हाण, सतीश इंगवले, सर्जेराव गुरव, जे. बी. लावंड, गणपत पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संभाजी काकडे यांनी आभार मानले.