कराड प्रतिनिधी । कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संरक्षण भिंतीवरून न्यायालयाकडून आलेल्या आदेशानंतर पालिकेने नुकतीच कारवाई केली. दरम्यान, कराड मार्केट यार्ड मर्चंट असोशिएनच्यावतीने शेती उत्पन्न बाजार समितीला हा रस्ता खुला केल्यास त्यामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत एक निवेदन देण्यात आले आले आहे. संबंधित खुला केलेला रस्ता हा तत्काळ बंद करण्यात यावा. जोपर्यंत रस्ता बंद केला जात नाही तोपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवणार असल्याचा इशारा असोसिएशनच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी कराड मार्केट यार्ड मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ लावंड, जयंतीलाल पटेल, प्रल्हादभाई शेठ, प्रकाश करपे आदी होते. यावेळी बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दिलेले निवेदनात म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची कल्पना मिळालेली असून सदरच्या निर्णयाचे कोणतेही उल्लंघन करावे, अशी आमची इच्छा नाही. परंतु सदरच्या निर्णयाने खुल्या होणान्या रस्त्यामुळे आम्हा सर्व व्यापार करणान्या व्यापारी लोकांना जो त्रास होणार आहे. त्याबद्दल सदरच्या निवेदनाने कळवत आहोत.
सदरचा रस्ता सुरु झालेस आम्ही शेतकऱ्याचा येणारा शेतमाल व येथुन बाहेरगावी जाणारा शेतमाल याची वाहतुक करणेकामी मोठमोठी वहाने सतत ये जा करत असतात. तो सर्व वाहने शेतमाल भरतेवेळी व उतरते वेळी वाहने रस्त्यावरतीच लावावी लागत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. आणि जर सदरचा रस्ता खुला झालेस वाहतुक प्रचंड वाढणार असून त्यामुळे आम्हास आमचा व्यापार करताच येणार नाही व आमचे व शेतकऱ्यांची मालाच्या सुरक्षेचा मोठा प्रश्नच निर्माण होणार आहे व मार्केट यार्डची पुर्ण सुरक्षा संपुष्टात येणार आहे.
याचा निषेध म्हणून आम्ही सर्व मार्केट यार्डातील दलाल, व्यापारी हमाल, किराणा व्यापारी आम्ही सर्व विनंती करतो की सदरचा सुरु केलेला रस्ता जो पर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आमची दुकाने बंद ठेवणेचा निर्णय घेतलेला आहे. याची नोंद घ्यावी तरी आमच्या निवेदनाचा आपण सहानभुतीकपूर्वक विचार करावा अशी विनंती ही निवेदनात करण्यात आली आहे.