कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण व उत्तर स्वीप पथकाच्या माध्यमातून वेणूताई चव्हाण महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग आणि निवडणुक साक्षरता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य ही कार्यशाळा नुकतीच पार पडली. आपल्या एका मताने ही फरक पडतो यासाठी मतदान करावे असे आवाहन स्वीप सहाय्यक नोडल अधिकारी सुनील परीट यांनी युवा मतदारांना केले.
कराड येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयात मतदान जनजागृती अभियान अंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्या श्रीमती एस आर सरोदे होत्या. जिमखाना उपाध्यक्ष डॉक्टर आर आर थोरात, स्वीप पथकाचे नोडल अधिकारी सौरभ करपे, प्रतिभा लोंढे, डॉ.महेंद्र भोसले, आनंदराव जानुगडे, ऋषिकेश पोटे, संतोष डांगे, गोविंद पवार, अनिल काटकर यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी महेंद्र भोसले यांनी युवा मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.तर आनंदराव जानुगडे यांनी प्रतिज्ञा वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी एस कराडे यांनी केले. तसेच विषय तज्ञांचा परिचय जे एस ओहळ यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ए एम मुजावर यांनी केले. यावेळी वेणूताई चव्हाण महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग व युवा मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.