कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी एकूण २२ उमेदवारांनी २८ नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे दाखल केली होती. दरम्यान, उमेदवारांच्या अर्जांची आज छाननी करण्यात आली. छाननीमध्ये हमीद रहीम शेख व सुवर्णसिंह शंकरराव पाटील या २ जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात 28 उमेदवारांकडून 31 नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली होती. त्यापैकी छाननीमध्ये जशराज शामराव पाटील यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून दाखल केलेले नामनिर्देशनपत्र पक्षाचा बदली उमेदवार म्हणून अवैध ठरवण्यात आले.
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून इंडियन नॅशनल काँग्रेसकडून पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण, भारतीय जनता पार्टीकडून अतुल सुरेश भोसले व सुरेश जयवंतराव भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून इंद्रजित अशोक गुजर, बहुजन समाज पार्टीकडून विद्याधर कृष्णा गायकवाड, वंचित बहुजन आघाडीकडून संजय कोंडीबा गाडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) कडून मुकुंद निवृती माने आदी ६ पक्षांची ७ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. या सर्वांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरविण्यात आली.
तर अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्यांमध्ये गोरख गणपती शिंदे, विश्वजीत अशोक पाटील, रविंद्र वसंतराव यादव, गणेश शिवाजी कापसे, ऋषिकेश विजय जाधव, हमीद रहीम शेख, प्रशांत रघुनाथ कदम, प्रकाश यशवंत पाटील, महेश राजकुमार जिरंगे, विजय नथुराम सोनावले, शमा रहीम शेख, शैलेंद्र नामदेव शेवाळे, चंद्रकांत भिमराव पवार, जनार्दन जयवंत देसाई व सुवर्णसिंह शंकरराव पाटील आदी १५ जणांचा समावेश होता. दरम्यान नामनिर्देशनपत्रे माघार घेण्याची मुदत शासकीय सुट्टीचे दिवस सोडून दिनांक 4 नोव्हेंबर 2024 दुपारी 3 वाजेपर्यंत आहे.