कराड प्रतिनिधी । 260, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 342 बुथपैकी सर्व कामकाज आटोपून सर्व मतदान साहित्य जमा करण्यासाठी शासकीय धान्य गोदाम कराड येथे दाखल झालेल्या पहिल्या ६ मतदान केंद्रांचा निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. या सर्व टीमनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप कोळी, आचारसंहिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी एस एस पवार, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, नायब तहसीलदार विश्वजीतसिंह राजपूत, प्र.नायब तहसीलदार युवराज पाटील, प्रांत कार्यालयाचे अव्वल कारकून गोपाल वसू यांची प्रमुख उपस्थिती होती.
तर यावेळी पार पडलेल्या सन्मान सोहळ्यास प्रांत कार्यालयाचे कर्मचारी प्रविण साळुंखे, प्रविण तुपे, प्रकाश नागरगोजे, आयटीसेलचे प्रवीण पवार, नोडल अधिकारी प्रमोद मोटे, नोडल अधिकारी के. प्रसाद, झोनल कॉर्डिनेटर विकास पाटील, शिवराज माळी, तांत्रिक अभियंता स्वप्निल नलवडे, राजेंद्र कांबळे, दिपक पाटील, प्रल्हाद देटके, अमोल चव्हाण, तेजस थोरात, अनुष कांबळे उपस्थित होते.