कराडला महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसची पोलिसांकडून तपासणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । समृध्दी महामार्गावर खासगी आराम बस जळून 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेनंतर खबरदारी म्हणून कराड येथे DYSP अमोल ठाकूर यांच्या पथकाने शनिवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास खासगी बसची तपासणी केली. यावेळी ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेचा दृष्टीने पूर्णपणे सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत का याची पाहणी केली. ज्या बसमध्ये कोणत्याही सुविधा नाहीत, अशा बसवर कारवाई देखील करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, समृध्दी महामार्गाच्या ट्रॅव्हल्स बसच्या अपघाताच्या पार्श्वभुमीवर शनिवारी रात्री कराडचे पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी
आरटीओ, वाहतूक नियंत्रण शाखा यांच्यासह कराडातील
खासगी आरामबसच्या तपासणी मोहिम हाती घेतली.

कराड, पाटण तालुक्यातून सुमारे 50 हून अधिक खासगी बसेस पुणे, मुंबई, नाशिकसह राज्यासह राज्याबाहेर जात असतात. खासगी आरामबसची संख्या मोठी आहे. कोल्हापूर नाका, वारूंजी फाटा, उंब्रज, ढेबेवाडी, पाटण, कुंभारगांव, तारळे, उंडाळे, शेडगेवाडी या भागातून अंदाजे चारशेवर खासगी बसेस जात असतात. या मार्गावरील अनेक खासगी बसेसमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना नसतात. दरम्यान, काही ट्रॅव्हल्स बसेसचे टायर फुटतील अशा अवस्थेत असल्याचे निदर्शनास आल्याने शनिवारी रात्री पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी खासगी बसेसच्या तपासणीची मोहिम राबवली.

प्रत्येक ट्रॅव्हलस बसची तपासणी करत त्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने साधने, उपाययोजना ठेवण्यात आली आहेत का याची खात्री केली. काही बसेस पोलीस दरम्यान, काही ट्रॅव्हल बसेस पोलिस ठाण्यात आणून त्यांच्या मालकांना समज देण्यात आली. यावेळी ट्रव्हल बांधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांशीही डिवायएसपी अमोल ठाकूर यांनी संवाद साधला.