कराड प्रतिनिधी | कराड येथील तालुका पोलिसांतर्फे पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ किंवा चोरीस गेलेल्या तब्बल सात लाखांचे ३० मोबाईल तक्रारदारांना परत केले. कराड तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बिहार, उत्तरप्रदेशसह कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यातून तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती घेत हे मोबाईल जप्त केले होते.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी कर्मचाऱ्यांना सीईआयआर पोर्टलद्वारे आपापल्या हद्दीतील तक्रारदाराचे गहाळ झालेले मोबाईल संच शोध घेण्याच्या. सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर व पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या सूचनेनुसार कऱ्हाड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्याचा शोध घेतला. त्यात सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर, सचिन भिलारी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे नितीन येळवे, उत्तम कोळी, सचिन निकम, सज्जन जगताप, किरण बामणे, मोहित गुरव, प्रफुल्ल गाडे यांनी बिहार, उत्तरप्रदेश तसेच कर्नाटक राज्यातून कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर
सोलापूर, पुणे जिल्ह्यात तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती घेऊन तब्बल सात लाखांचे ३० मोबाईल प्राप्त केले. पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या हस्ते त्या तक्रारदारांना मोबाईल संच परत केले आहेत.