कराडसह परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले 92 जण हद्दपार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड पोलिसांनी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर तब्बल 92 जणांवर तडीपारीची कारवाई केलेली आहे. गणेश विसर्जन शांततेत व आनंद वातावरणात पार पडावे यासाठी पोलिसांनी कारवाई केली आहे.

सध्या महाराष्ट्रात सर्वजनिक गणेशोत्सव मोठया प्रमाणात उत्साहाने साजरा होत आहे. कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक सण, उत्सवा दरम्यान गोंधळ करुन कायदा व सुव्यवस्था निर्माण करणाऱ्या तसेच पोलीस अभिलेखावरील गुन्हे असलेले आरोपीत यांचे गणेशात्सवा दरम्यान कराड पोलीस ठाणे हद्दीत येणेस मज्जाव करणे करीता मा. उपविभागीय दंडाधिकारी कराड़ विभाग कराड यांचेकडे प्रस्ताब सादर करणेत आले होते.

सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत व कायदा व सुव्यवस्थेत पारपाडणेसाठी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. के.एन.पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारीपोलीस अंमलदार यांनी रेकॉर्डवरील लोकांचे अभिलेख पड़तादन त्यांचेवर गणेशोत्सवात योग्य व कड़क प्रतिबंथक कारवाई होणेसाठी प्रस्ताव पाठविले होते. आरोपीवर कलम 163 (२) प्रमाणे पाठविले प्रस्तावांधी चौकशी होऊन मा. उपविभागीय दंडाधिकारी सो कराड विभाग कराड यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना गणेशेत्सवाचे अंतिम चरणामध्ये कराड शहर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये प्रवेश व वास्तव्यबंदी केलेली आहे.

याबाबतचे आदेश दि. 13.09.2024 रोजी प्राप्त झाल्यानंतर त्या आदेशांची कराड शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सहाय्यंक पोलीस गर्णेश कड़ यांचे पथकाने संबंधीतांवर आदेशाची अंमलबजावणी करुन 92 जणांना कराड शहर पोलीस ठाप्याची हद्द सोडणेचे फर्मान काढले आहे. गणेशोत्सव अनुषंगाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

कराड शहरातील सुज्ञ नागरिकांना व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील पदाधिकारी यांना कराड शहर पोलीसस्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.के. एन. पाटील यांनी कराड शहर पोलीसांतफे आवाहन केले आहे की, कराड शहरामध्ये19 पोलीस अधिकारी,169 पोलीस अंमलदार व 50 होमगार्ड असा बंदोबस्तं नेमण्यात आला असुन 240 कराड शहरामध्ये कॅमेरेमिरवणुक मेन मार्गावर 45 कैँमेरे ठेवण्यात आले बसुन कोणी व्यक्ती गणेशोत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडविणेचा प्रयत्नंकरीत असल्याचे आढव्दुन आल्यास तात्काळ पोलीस ठाण्याचे फोन नंबर 02164-222233, अथवा नजिकच्या पोलीस अंमलदार,अधिकारी याना कळवावे किंवा डायल ११२ वर कॉल करुन कळवावे असे आवाहन केले आहे.

तात्पुरते हहृपार करणेत आले इसमांनी हद्दपार कालावधीमध्ये मा. उपविभागीय दंडाधिकारी कराड विभाग कराड अथवा कराड शहर पोलीस ठाणेचे प्रभारी वरीष्ठ पोलीस निरीक्षिक यांचे परवानगीशिवाय प्रवेश करु नये. हद्दपार इसमाने विनापरबाना कराड़ शहर पोलीस ठाणे हहीत प्रवेश केल्यास किंवा हद्पार आदेशाचे उल्लंघन केल्यास अशा हद्ृपार व्यक्तीवर कराड शहर पोलीस ठाण्याकडून प्रचलीत कायदयान्वये कडक कायदेशीर कारवाई करणेत येणार आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक श्री. समीर शेख, मा.अपर पोलीस अ्थीक्षक सातारा श्रीमती वैशाली कड़ुकर,सो. मा, श्री, अतुल म्हेत्रे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील कराड शहर पोलीस ठाणे यांच्यामार्गदर्शनाखाली सहाय्यंक पोलीस निरिक्षक गणेश कड ,पोलीस उपनिरीक्षक निखील मगदम पो.हवा.शशिकांत काळे. अमितपवार, अशोक वाड़कर ,सपना साळ्हुखे,पोलीस नाईक अनिल स्वबामी,संदीप कुभार, पो.शि..आनंदा जाथव,धीरज कोरडे, अमोलदेशमुख,मुकेश मोरे,दिग्विजय सांडगे, मोहसिन मोमिन,हर्ष सुखदेव, मोहसिन मोमिन,संग्राम पाटील,महिला पोलीस सोनाली पिसाळ,यांनी केलेली आहे.