Karad News : पोलिसांकडून आगाशिवनगर परिसरात कोम्बिंग ऑपरेशन; 4 गाड्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराडचे DYSP अमोल ठाकूर यांनी पदभार सांभाळताच परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठोस पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे कराड शहरालगत असलेल्या आगाशिवनगर परिसरात रात्री पोलीस उपअधिक्षकांच्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यावेळी पोलिसांनी 4 गाड्या ताब्यात घेतल्या. या दुचाकी नेमक्या कोणाच्या मालकीच्या आहेत याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

कराड पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्याचे काम चालू असून सध्या त्यांच्या हालचालींवर लक्ष्य ठेवणे सुरु आहे. पोलिसांनी अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली. खास करून त्यांनी झोपडपट्टीत करत अवैध व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला. या संपूर्ण परिसरात 4 दुचाकीही पोलिसांना आढळून आल्या. पोलीस स्टेशनमध्ये या सर्व गाड्या आणल्या असून त्या कशासाठी वापरल्या गेल्या आणि कोणाच्या मालकीच्या आहेत याचा शोध पोलीस करत आहेत. तसेच जर नागरिकांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन अमोल ठाकूर यांनी केलं .

दरम्यान, उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी कराडचा पदभार हाती घेतल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा फास आवळण्यास सुरूवात केली आहे.. मागील 15 दिवसांपूर्वी त्यांनी कराडमधील बुधवारपेठेत अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवून तडीपार असलेल्या संशयिताला ताब्यात घेतले होते. तसेच मसूर भागातील युवकाकडून पिस्टल हस्तगत करत त्याला ताब्यात घेतले. आता तर त्यांनी आगाशिवनगर परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारी संपवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे .