कराड प्रतिनिधी | ओगलेवाडी पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीतील विरखडे, ता. कराड येथील फाऊंड्री कारखान्यातून दीड लाखाच्या पितळी बेअरींग प्लेटा चोरणाऱ्या सहा जणांना कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. भरवस्तीत झालेला घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. सुमारे दोन महिन्यांनी संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले.
राजेश ऊर्फ नितीन बबन चव्हाण, अभिजीत विजय मदने, अभिजीत उत्तम तीरमारे, संतोष बाबुराव जाधव, विशाल विजय मदने (सर्व रा. बनवडी, ता. कराड) आणि अजय जगु मोरे (रा. नांदगाव, ता. कराड), अशी संशयितांची नावे आहेत. घरफोडीत चोरीला गेलेल्या दीड लाख रुपये किंमतीच्या पितळी बेअरींग प्लेटा संशयितांकडून हस्तगत केल्या आहेत.
फाऊंड्री कारखान्यातील चोरी प्रकरणी कराड पोलिसाकडून सहा जणांना अटक pic.twitter.com/jsXYFDdPAH
— santosh gurav (@santosh29590931) June 7, 2024
विरवडे (ता. कराड) येथील गणेश फाऊंड्री कारखान्यातून २४ मार्च ते २७ मार्च या दरम्यान पितळेच्या बेअरींग प्लेटा चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. डीवायएसपी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एस. पवार, गणेश कड, पोलीस उप निरीक्षक पंतग पाटील, हवालदार सचिन सुर्यवंशी, प्रविण काटवटे, धीरज कोरडे, महेश शिंदे, कपिल आगलावे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित निष्पन्न करून त्यांना अटक केली.