कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील विंग येथे दि. 22 मार्च रोजी मध्यरात्री MH50 मेन्स वेअर या कापड दुकानाच्या शटरचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडुन आतील ग्लासचे डिजीटल लॉक उचकटून चोरी केल्याची घटना घडली होती. याबाबत दाखल झाल्यानंतर 2 दिवसात कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांच्या पथकाने चोरट्याला अटक केली तसेच 72 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अल्ताफ मगदुम मुल्ला, (रा. चचेगांव, ता. कराड ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 23 मार्च 2025 रोजी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या सुचना नुसार कराड तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे तात्काळ आरोपी शोध कामी रवाना झाले होते. पहिल्या टप्यात विंग स्टॉप, कोळे, कोळेवाडी, व चचेगांव वरील प्राप्त सी.सी.टी.व्ही फुटेज सलग 2 दिवस पाहुन त्याच्या साहयाने व खास बातमीदाराच्या महिती प्रमाणे संशयीत इसम यांची पडताळणी केली. व सलग दोन दिवस पाठलाग करुन अल्ताफ मगदुम मुल्ला यास ताब्यात घेतले. त्याचेकडे विचारपुस करीत असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याचेकडे कसुन तपास करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले.
त्यावेळी त्याने रात्री 2 वाजण्याच्या सुमारास मोटार सायकलवर येवून सदर दुकानातून 02 पोती भरुन कपडे घेऊन गेल्याचे कबुल केले. अशा प्रकारे सदर चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे दिसून आल्याने त्यास या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारे सदर चे संशयीत आरोपीला सदर गुन्ह्याचे कामी ताब्यात घेतले व त्याचे कडे कसुन चोकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा MH50 मेनूस बेअर या कापड दुकानात पैशाच्या हव्यासापोटी केल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडून चोरीस गेलेला कापड दुकानातील एकूण 72 हजारचा मुद्देमाल तसेच गुन्हयात वापरलेला मोबाईल व एक मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोहवा राजगे हे करीत आहेत.
वरील कामगिरी पोलीस अधिक्षक समीर शेख तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व कराड तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक नितीन येळवे, पोलीस हवालदार सचिन निकम, उत्तम कोळी, किरण बामणे, पोलीस नाईक विनोद माने, मोहित गुरव, प्रफुल्ल गाडे यांनी केली आहे.