कराड उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची उद्या 14 टेबलवर होणार मतमोजणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघाच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठीच्या मतदानाची उद्या दि. २३ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरु होणार आहे. आठ विधानसभा मतदार संघापैकी सर्वाधिक चर्चेत असलेल्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी कराड उत्तर निवडणूक प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी विविध १४ पथके स्थापन करण्यात आली आहेत. उद्या १४ टेबलावरून मतमोजणी केली जाणार आहे.

सर्व पथकांचे मध्यवर्ती अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मतमोजणीचे प्रशिक्षण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, लालासाहेब गावडे, डॉ. जस्मिन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले आहे. सिलिंग पथक क्रमांक एक व दोन, साहित्य वाटप पथक, सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) इन्चार्ज पथक, एनकोर पथक, संगणकीकरण पथक, पत्रव्यवहार पथक, मतदान यंत्र वाटप पथक, माध्यम पथक, भोजन व्यवस्था व हजेरी पथक, मतमोजणी कामे नियुक्त उमेदवार, प्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी यांना ओळखपत्र वाटप करणारे पथक कार्यालयातील विद्युत पुरवठा, दूरध्वनी व इंटरनेट सुविधा, जनरेटर अंतर्गत विद्युत पुरवठा, वैद्यकीय सहाय्यता, कार्यालय स्वच्छता, सुरक्षा मानधन वाटप इत्यादी विविध पथकांचे गठन करण्यात आले आहे.

प्रशिक्षणात प्रत्येक मध्यवर्ती अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे स्वरूप निश्चित करून दिले आहे. त्याप्रमाणे सर्व मध्यवर्ती अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाचे सूक्ष्म नियोजन करून ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात सादर करावे, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिल्या आहेत. नेटके नियोजन करण्यात आले आहे.