कराड प्रतिनिधी । कराड शहरातील व परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. शहरात दररोज मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा हा केला जातो. मात्र, कराड शहरात उद्या गुरुवार दि. १२/१०/२०२३ ते दि. १५/१०/२०२३ रोजीपर्यंत सलग चार दिवस सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती कराड पालिकेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आलेली आहे.
कराड पालिकेच्यावरतीने आज महत्वाचे निवेदन काढण्यात आलेले आहे. या निवेदनाद्वारे पालकेने शहरातील पाणी पुरवठा हा बंद राहणार असल्याचे हायर केले आहे. निवेदनात म्हणाले आहे की, उद्या गुरुवार दि. १२ राजापासून ते दि. १५ रोजी पर्यंत कालावधीत जलशुध्दीकरण केंद्राकडील मौजे वांरुजी येथील अशुध्द पाणी उपसा पंपगृह (जॅकवेल) मधील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
या कामामुळे उद्या दि. १२/१०/२०२३ ते दि. १५/१०/२०२३ या चार दिवशी सायंकाळी होणारा पाणी पुरवठा हा अकेला जाणार नाही. याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी. तसेच, पाण्याचा वापर काटकसरीने करावा व नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आव्हान मुख्याधिकाऱ्यांच्यावतीने करण्यात आले आहे.