कराड नगरपालिकेचा दिल्लीत आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव; घनकचरा व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीची दखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनीधी | कराड नगरपरिषदेने गेल्या अनेक वर्षात स्वच्छ सर्वेक्षणासह विविध उपक्रमात देशपातळीवर अव्वल कामगिरी केली आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात कराड नगर पालिकेने (Karad Municipality) उत्तम कामगिरी केली आहे. याचे फलित म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या विज्ञान आणि पर्यावरण संस्थेच्यावतीने घनकचरा व्यवस्थापन (Solid Waste Management) मधील उत्कृष्ट व सातत्यपूर्ण कामगिरी बद्दल दिल्ली येथे आज कराड नगर पालिकेस पुरस्कार देऊन आज गौरविण्यात आले.

देशभरातून निवडलेल्या 150 संस्थापैकी महाराष्ट्रातील कराड नगरपरिषद एकमेव ठरली आहे. हा पुरस्कार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे व आरोग्य अभियंता गिरीश काकडे यांनी आज दिल्ली येथे स्वीकारला. कराड नगर परिषदेची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतल्याने सर्वत्र पालिकेच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

कराड नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापनामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल आज दि. 19 डिसेंबर रोजी दिल्ली येथील इंडिया हॅबिटेट केंद्रात आंतरराष्ट्रीय विज्ञान व पर्यावरण संस्थेच्या संस्थेच्या संचालिका डॉ सुनीता नारायण यांचेकडून कराड नगर परिषदेस गौरविण्यात आले. याप्रसंगी नगरपालिकेतर्फे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नगरपरिषदेचे आरोग्य अभियंता गिरीश काकडे यावेळी उपस्थित होते.

विज्ञान आणि पर्यावरण संस्था ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरणपूरक उपक्रम व प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपक्रम व प्रशिक्षण देणारी संस्था आहे. २०२४ साठी या संस्थेकडून देश पातळीवर सर्व महानगरपालिका, नगरपालिका , नगरपरिषद, सार्वजनिक उपक्रम व संस्था मधुन घनकचरा व्यवस्थापन मध्ये उच्चतम व् सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या 150 संस्था निवडल्या गेले आहे. यामध्ये महाराष्टातील नगरपालिका या वर्गात एकमेव कराड नगर परिषदेचा समावेश आहे.