कराड प्रतिनिधी । कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील त्रिशंकू भागात असलेली संरक्षक भिंती पाडून रस्ता खुला करून द्यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून कराड नगरपालिकेस काही दिवसापूर्वी आदेश दिले होते. पालिकेकडून देखील सुरुवातीला थोडी भिंत पाडत कारवाई करण्यात आली. मात्र, नंतर पालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्रिशंकू भागातील रहिवाशांनी आज आक्रमक पावित्रा घेत थेट कराड पालिकेवर धडक मोर्चा काढला. यावेळी आक्रमक झालेल्या रहिवाशांनी जोपर्यंत बाजार समितीतील रस्ता खुला करून दिला जात नाही तोपर्यंत आंदोलनं सुरूच ठेवणार असल्याचे सांगत पालिके समोरच ठिय्या आंदोलन सुरु केले.
रस्त्याच्या समस्येबाबत पालिकेकडून जाणीवपूर्वक केल्या जात असलेल्या दुर्लक्षामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते मुसद्दीक आंबेकरी, अख्तर आंबेकरी, रफीक मोमीन, श्री. पटेलयांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी त्रिशंकू भागापासून ते टाऊन हॉलमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पालिकेपर्यंत मोर्चातून दाखल झाले.
कराड बाजार समितीच्या ‘त्या’ रस्त्याच्या प्रश्नी त्रिशंकू भागातील रहिवाशी आक्रमक; पालिकेवर काढला थेट धडक मोर्चा pic.twitter.com/TqTP3T7st8
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 10, 2023
उच्च न्यायालयाचा आदेश असूनही रस्ता खुलाला केलेला नाही तो खुला करावा, अशी मागणी करत मुजावर कॉलनी, खराडे कॉलनी, शांतीनगर आदी कॉलनीतील रहिवाशांनी मोर्चातून पालिका आवारात दाखल झाल्याने यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्ह्णून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी नागरिकांनी पालिकेसमोर दाखल होत ठिय्या मांडला. यावेळी काही नागरिकांनी आपली मनोगते देखील व्यक्त केली.
व्यापाऱ्यांचा आजपासून बेमुदत बंद
कराड शेती उत्पन्न बाजार समितीला संरक्षण कायम रहावे, यासाठी ती भिंत पाडून रस्ता देवू नये, या मागणीसाठी शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील व्यापाऱ्यांनी आजपासून बेमुदत बंद ठेवला आहे. मार्केट यार्ड मर्चंट असोशिएसनने दोन दिवसापूर्वी त्यांचे निवेदन सभापती विजय कदम यांना दिलो होते. त्यानुसार आजापसून त्यांनी दुकाने बंद ठेवून त्याचा निषेध केला आहे. मार्केट यार्ड मर्चंट असोसिएशनला कराड किराणा भुसार व्यापारी असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पाठिंब्यासाठी (मंगळवार) आणि (बुधवारी) अशा दोन दिवशी शहरातील किराणा दुकाने बंद ठेऊन पाठिंबा दिला आहे. त्यासोबत श्यामराव भाजीपाला मार्केटनेही या मार्केट यार्ड मर्चंट असोसिएशनला पाठिंबा दिला आहे. भाजीपाला विक्री गुरूवारी व शुक्रवारी अशा दोन दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे.