कराडातील ‘हा’ रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा; वाहतूक कोंडी, अपघाताच्या घटनांकडे पोलिस प्रशासनाचं दुर्लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड-मलकापूर मार्गावरील मार्केटयार्ड परिसरात स्वा. सै. शामराव पाटील भाजीपाला व फळे मार्केट मार्गावर गुरुवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. सुमारे दोन तास एक किलो मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. या परिसरातीलच कराड – तासगाव मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती गेट नंबर तीन जवळ मंगळवारी काले येथील एका शिक्षकाचा मालट्रकखाली सापडून अपघाती मृत्यू झाला होता. कराड तासगाव मार्गाबरोबरच मार्केटयार्डहुन मलकापूरकडे जाणारा हा मार्ग वाहनांच्या वाढलेल्या वर्दळीमुळे धोकादायक बनला आहे. याकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे. अजून किती अपघाती मृत्यू झाल्यानंतर पोलिसांना जाग येणार? असा सवाल नागरिकांतून उपस्थिती केला जात आहे.

कराड येथील भेदा चौकातून कराडहून मलकापूरकडे जाणाऱ्या मार्गावर स्वा. सै. शामराव पाटील भाजीपाला फळे मार्केट आहे. या ठिकाणी कराडसह परिसरातील शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात. शिवाय दर गुरुवारी आठवड्यातून एकदा जनावरांचा खरेदी विक्रीचा मोठा बाजार देखील येथील मार्केटमध्ये भरतो. या ठिकाणी मोठ्या संख्येने जनावरे घेऊन येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी वारंवार निर्माण होते.

आज गुरुवारी जनावरे बाजार असल्याने तसेच रमजान ईद जवळ आल्याने या ठिकाणी सकाळी सहा वाजल्यापासून वाहतूक कोंडी निर्माण झाली. सकाळी नऊ ते अकरा या सुमारे दोन तासाहून अधिक वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने या मार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

वाहतूक कोंडीच्या समस्येकडे पोलिसांनी लक्ष द्यावे : अभिषेक माने

सध्या कराडच्या कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने या मार्गे जाताना वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. अनेक वाहनधारक पर्यायी मार्ग म्हणून कराड मार्केटयार्ड ते मलकापूर या मार्गाचा वापर करत आहेत. या मार्गावरून मलकापूरसह परिसरातील गावातील नागरिक देखील आपली वाहने घेईन प्रवास करत असल्याने मार्केटयार्ड मरगावर वाहतूक कोंडी होत असून याचा स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आज गुरुवारी सकाळी जनावरे बाजार असल्याने दोन तास या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. येथील वाहतूककोंडीच्या समस्येकडे पोलिसांनी लक्ष देणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया मलकापूर येथील अभिषेक माने यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहनचालकांकडून या मार्गाचा वापर

सध्या कराड येथील कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे या ठिकाणाहून मलकापूरकडे जाणारी वाहने तसेच मुख्य महामार्गावरील वाहने जास्त संख्येने असल्याने वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. परिणामी कराडहून मलकापूरकडे जाण्यासाठी दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालक मार्केट यार्ड, बैल बाजार रोड, मलकापूर ते नांदलापूर या मार्गाचा वापर करत आहेत. मलकापूरकडे जाणारा बैल बाजार येथील पर्यायी रस्ता असल्याने कराडहुन मलकापूरकडे जाताना कमी वेळ लागत आहे. मात्र, तर वाहनांमुळे दररोज सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते ८ या वेळेत या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढून वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या सर्वाधिक

कराड मलकापूर मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे शामराव पाटील भाजीपाला फळे मार्केट आहे. या मार्केटमधून कराड तालुक्यासह परिसरातील गावातून भाजीपाला, फळे मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीसाठी येतात. या ठिकाणी दररोज लाखो रुपयांची शेतमालाच्या खरेदीविक्रीतून उलाढाल होते. तसेच दर गुरुवारी जनावरांचा बाजार भरत असल्याने गुरुवारी जनावरांच्या खरेदी विक्रीतून देखील एक दिवसात लाखो रुपये उलाढाल केली जाते.

तीन दिवसापूर्वीच झाला शिक्षकाचा अपघात

कराड येथील जनावराचा खरेदी विक्रीचा बाजार असल्याने दर गुरुवारी भाजीपाला मार्केट मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होते. तसेच या परिसरातून ये- जा करणाऱ्या दुचाकीस्वारांचे मोठ्या वाहनांना धडकून अपघात देखील होण्याच्या घटना घडतात. तीन दिवसांपूर्वी मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास काले येथील शिक्षकाचा एका माल ट्रकखाली सापडून जागीच मृत्यू झाला. हि घटना ताजी असताना कराड मार्केटयार्ड मलकापूर मार्गावर देखील अशीच अपघाताची परिस्थिती निर्माण होत आहे. या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून यावर पोलिस प्रशासनाने ठोस उपाय करणे आवश्यक आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी होणे आवश्यक

  • अवजड वाहनांची वाहतूक सकाळी ८ ते १२ या वेळेत बंद ठेवणे.
  • वाहतूक पोलिसांची कायमस्वरुपी नेमणूक करणे.
  • दर गुरुवार किमान दोन वाहतूक कर्मचाऱ्यांची या ठिकाणी ड्युटी लावणे.
  • मार्केटयार्डच्या मुख्य गेटसमोर व मार्गावर रस्त्यावर अडथळा ठरतील अशी वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करणे.