कराड अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी रोजगार मेळावा, 11 हजार पदांसाठी भरती; तब्बल 128 कंपन्यांचा सहभाग

0
12

कराड प्रतिनिधी | शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड (Government Engineering College Karad) व केंद्रीय संस्था शिक्षुता प्रशिक्षण मंडळ संयुक्त विद्यमाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात बीई, बीटेक, डिप्लोमा, बी फार्मसी, आयटीआय, बीएसस्सी, बी.ए., बी. कॉम., बी.बी.ए. आणि इतर विविध अभ्यासक्रमांच्या टेक्निकल, नॉन टेक्निकल विद्यार्थ्यांसाठी 128 पेक्षा जास्त विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये 11 हजार पेक्षा जास्त देशात व परदेशात रोजगार संधी उपलब्ध झाल्या असल्याची माहिती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता प्रा. उमा पाटील यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सहाय्यक प्राध्यापिका पौर्णिमा कावलकर, प्रा. सौरभ यादव, कार्यशाळा अधिक्षक राजेश गायकवाड यांची उपस्थिती होती. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयची स्थापना करण्यात आली. त्यामुळे सामाजिक दायित्वाची भावना ठेवून या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे सह देशातील टॉपच्या कंपन्या सहभागी होणार आहेत. विविध कंपन्यांमध्ये सध्या सुमारे 11 हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे या रोजगार मेळाव्यातून रोजगाराची संधी युवकांना देण्यात येणार आहे.

अशी करा ऑनलाइन नोंदणी : https://tinyurl.com/yck8ym7c

मेळाव्यात बी.ई., बी.टेक., डिप्लोमा, बी. फार्मसी, आयटीआय, बी.एस्सी, बी. ए., बी. कॉम., बी. बी.ए. आणि इतर विविध अभ्यासक्रमांच्या टेक्निकल, नॉन टेक्निकल विद्यार्थ्यांसाठी देशात, परदेशात रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात ७५ लाख रोजगार निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रेरणेने आणि स्किल इंडिया योजनेच्या अंतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या या रोजगार मेळाव्याचे आयोजन मुख्यतः राज्यातील शेती, बांधकाम, वाहतूक पर्यटन या व्यवसायातील वाढती उलाढाल व वाढती औद्योगिक गुंतवणूक यामधून विविध क्षेत्रातील नामंकित कंपन्यांमधील, सेवा क्षेत्रातील निर्माण झालेल्या रोजगार संधीचा लाभ अधिकाधिक राज्यातील ग्रामीण शहरी, निम शहरी सर्व पात्र युवक युवती मिळावा आणि त्यांना त्यांच्या करिअरची सुरुवात नामांकित कंपनी मधून सुरु करण्याची संधी मिळावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विविध योजना द्वारे सर्व क्षेत्रात रोजगार निर्माण होत आहेत याचा फायदा राज्यातील युवक युवती यांना होईल व या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.