कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कराड शहर उपाध्यक्ष श्री.अभिषेक भोसले आणि मित्र समूहांच्या वतीने कराड येथे नुकतीच कराड दक्षिण श्री 2025 ही जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली. कराड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बुधवार पेठ या ठिकाणी पार पडलेल्या स्पर्धेस संपूर्ण सातारा जिल्ह्यातून विविध ठिकाणीहून आलेल्या जबरदस्त शरीर सौष्ठव पट्टूनी चांगली कामगिरी दाखवून प्रेक्षकांचे मन जिंकले.
शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा कुटुंब प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांची उपस्थिती होती तर ओमकार मुळे, उमेश शिंदे, नितीन ढेकळे, सिद्धार्थ थोरवडे, अभिजित सूर्यवंशी, शिवराज इंगवले, वाजिद मुल्ला, आशुतोष डुबल, महादेव पवार, पंकज पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी स्पर्धेत एकूण वीस क्रमांक काढण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक अभिजीत पाडळे, दुसरा क्रमांक विक्रम कारंडे, तिसरा क्रमांक रामा मैनाक, चौथा क्रमांक सुरज निवसे, पाचवा क्रमांक राकेश साळुंखे, सहावा क्रमांक ओम शिंदे, सातवा क्रमांक राजेंद्र यादव, आठवा क्रमांक अनिश शेख, नववा क्रमांक करण जाधव, दहावा क्रमांक लक्ष्मण सोळंके, अकरावा क्रमांक सुयश आचा, बारावा क्रमांक सिद्धेश पवार, तेरावा क्रमांक गौरव उंबरकर, चौदावा क्रमांक रेहान शेख, पंधरावा क्रमांक कार्तिक काजले, सोळावा क्रमांक मोहस मनेर, सतरावा क्रमांक श्री शिंदे , अठरावा क्रमांक कृष्णा पडळकर, एकोणीस क्रमांक रविराज सुतार, विसावा क्रमांक सत्यम कचरे असे क्रमांक काढण्यात आले.
यावेळी टॉप ट्वेंटी स्पर्धा उत्कृष्ट रित्या पार पडली. त्याच बरोबर मोस्ट मसक्युलर आणि पब्लिक डिमांड यांना सुद्धा बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेसाठी जज म्हणून राजेंद्र हेंद्रे, मुरलीवत्स, नितीन माने, अमोल ननवरे, धनंजय चौगुले, उमेश मोहटकर, कडणे सर, अपूर्वा यांनी काम पाहिले.