भारतरत्न विश्वेश्वरैय्या पुरस्कार निवृत्त कार्यकारी अभियंता आबासाहेब शिंदे यांना जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । दि कराड आर्किटेक्ट ॲड इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने यावर्षीचा विश्वेश्वरय्या पुरस्कार २०२३ कराड तालुक्यातील केसे येथील निवृत्त कार्यकारी अभियंता आबासाहेब शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते शुक्रवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता वेणुताई चव्हाण स्मारक येथे पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष इंजिनिअर महेश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दि कराड आर्किटेक्ट ॲड इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने कराड येथे आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष इंजि. दिग्विजय जानुगडे, सेक्रेटरी इंजि. अमित उंद्रजकर, खजिनदार इंजि. चंद्रकांत पोळ असोसिएशनचे संचालक इंजि. मिलिंद पाटील, इंजि. मकरंद जाखलेकर इंजि. किशोर साळुंखे, इंजि. राजेंद्र जाधव, इंजि. प्रतिक जाधव, इंजि. रोहित शर्मा, इंजि क्षितिज बेलापुरे, इंजि, धैर्यशील यादव, इंजि, अजिंक्य पाटील यांची उपस्थिती होती.

यावेळी कुलकर्णी म्हणाले की, शुक्रवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ५६ वा अभियंता दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सिक्कीमचे माजी राज्यपाल, खा. श्रीनिवास पाटील, कृष्णा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मुख्य अभियंता एस. के.
सुरवसे उपस्थिती राहणार आहे.

समृद्धी महामार्गावरील कामांचे होणार सादरीकरण…

कराड येथे शुक्रवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी एक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ‘समृद्धी महामार्गावरील उभारणी दरम्यान वाहन चालकांची घेण्यात आलेली विशेष काळजी’ याबाबत मुख्य अभियंता एस. के. सुरवसे व अधीक्षक अभियंता विश्वनाथ सातपुते हे मार्गदर्शन करणार आहेत.