Satara Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी कराड प्रशासन सज्ज; दक्षिण- उत्तरेतील 324 मतदान केंद्राचे वेबकास्टिंग करण्यात येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक 2024 (Satara Lok Sabha Election 2024) साठी कराड दक्षिण व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी कराड प्रशासन सज्ज झाले असून आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे व कराड उत्तरचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी केले.

कराड येथील प्रांत कार्यालयात कराड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कराडचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे म्हणाले की, कराड दक्षिणेत 309 तर उत्तरेत 338 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून लोकसभा उमेदवारी अर्ज दि. 12 एप्रिल ते दि.19 एप्रिल पर्यंत भरण्यात येणार आहे. दि. 22 एप्रिलला अर्ज इच्छुकांना मागे घेता येणार आहेत. दि. 7 मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून दि. 4 जूनला मतमोजणी होणार आहे.

यावर्षी प्रथमच कराड दक्षिण व उत्तर या दोन्ही मतदारसंघातील 50 टक्के मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग होणार आहे. तसेच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी साक्षश्रता क्लबची निर्माण करण्यात आले असून प्रचार परवानग्यांसाठी एक खिडकी सुविधा सुरू करण्यात आले आहे. कराड दक्षणी विधानसभा मतदार संघात एकूण मतदार संख्या २ लाख 98 हजार 303 असून यामध्ये सैनिक मतदार 672 आहेत. शहर विभागात 48 तर ग्रामीणसाठी 157 असे 309 मतदान केंद्रे आहेत. याचबरोबर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी 31 साक्षरता क्लबची निर्मिती करण्यात आली आहे. या मतदारसंघात 2278 इतक्या दिव्यांग मतदारची संख्या आहे. तसेच 154 मतदान केंद्राचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. याचबरोबर पाच भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

कराड उत्तर मतदारसंघाची माहिती देताना विक्रांत चव्हाण म्हणाले की, एकूण मतदार संख्या 2 लाख 93 हजार 154 असून यामध्ये सैनिक मतदार 2444 आहेत. शहर विभागात आठ, तर ग्रामीणसाठी 242 असे 338 मतदान केंद्रे आहेत. याचबरोबर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी 20 साक्षरता क्लबची निर्मिती करण्यात आली आहे. या मतदारसंघात 1778 इतक्या दिव्यांग मतदारची संख्या आहे. तसेच 170 मतदान केंद्राचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.