कराडच्या सुप्रसिद्ध A N FISH ची शाखा आता दुबईत!; पहा व्हिडिओ

0
636
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । मासे विक्रीसाठी प्रसिद्ध असणारी आणि अवघ्या काही काळात नावारूपास आलेली कराड शहरातील ए एन फिश कंपनीने आता दुबईत देखील आपली शाखा सुरु केली आहे. कराड सारख्या शहरातील मासेविक्री करणारी ए एन फिश कंपनीने देशाबाहेर शाखा सुरु केल्यामुळे कराडच्या नावलौकिकात भर पडली आहे. विशेष म्हणजे ए एन फिश कराडला महाराष्ट्र शासनाकडून उत्कृष्ट फिश विक्रेता म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

Facebook आणि Instagram यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या साह्याने तसेच प्रत्यक्ष कराड येथून ए एन फिश कंपनीद्वारे अगदी फ्रेश मासे, मसाले आणि इतर मासे-आधारित उत्पादने विक्री केले जातात. कराडसह आसपासच्या जिल्ह्यात देखील ए एन फिशद्वारे विविध प्रकारचे मासे, जसे की बांगडा, सुरमई, कोळंबी आणि इतर सी-फूडची विक्री केली जाते.

इन फिशच्या माध्यमातून सोशल मीडियातुन शेअर होणाऱ्या पोस्ट्सना लोकांची व खवय्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. ज्यामुळे त्यांची लोकप्रियता दिसून येते. शिवाय ए एन फिशद्वाराने विविध योजना आणि ऑफर्स देखील दिल्या जात असल्यामुळे ग्राहकी देखील अधिक आकर्षित होतात. ए एन फिश कराडमधील एक लोकप्रिय आणि विश्वासार्ह मासे विक्री करणारी कंपनी असून ज्यांना त्यांच्या फ्रेश उत्पादनांसाठी आणि चांगल्या सेवेसाठी हि कंपनी ओळखली जाते.

ए एन फिश कराडची शाखा लवकरच दुबईत : अमीर नदाफ

कराड येथील ए एन फिश कंपनीच्यावतीने दुबईत देखील शाखा सुरु करण्यात आली असल्याने ‘हॅलो महाराष्ट्र’ने ए एन फिश कंपनीच्या अमीर नदाफ यांच्याशी संवाद साधला. यावेळी नदाफ यांनी आजच्या काळात कोणताही व्यवसाय करता आला पाहिजे. आणि व्यवसाय क्षेत्रात नाव कमवता आलं पाहिजे. कराड शहरातून आम्ही ए एन फिशच्या माध्यमातून विविध मासे विक्रीला सुरुवात केली. कंपनी सुरु करताना आपले मासे जगाच्या कानाकोपऱ्यात कसे घेऊन जात येईल त्यासाठी प्रयत्न केला. राज्यभरात शाखा सुरु केल्यानंतर आता ए एन फिश कंपनी कराडची शाखा दुबई या नावाने दुबईत शाखा सुरु करत आहोत. ‘हॅलो महाराष्ट्र’ ने आमच्या व्यवसायाच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभारी असल्याची प्रतिक्रिया ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.