सातारा प्रतिनिधी | राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी साताऱ्यातील व्यापारी पेठेमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना महायुतीचे उमेदवार छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रचार पत्रक सर्व व्यापाऱ्यांना वाटप केले. दरम्यान, पोवई नाक्यावरील सुशांत नावंधर यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी (PNVM) यांचा उदयनराजे यांना जाहीर पाठींबा दर्शवला. शिवेंद्रसिंहराजे यांच्या शहारातील कट्टर समर्थकांनी दिली उदयनराजे यांची साथ.
राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी सातारा शहरातील विविध व्यापाऱ्यांची सदिच्छा भेट घेऊन संवाद साधला. यावेळी माधव सारडा, मनीष लाहोटी, सुशांत नावंधर, राजेंद्र खंडेलवाल, मुकुंद लाहोटी, अतुल बारटक्के, आनंद मालपाणी, सुयश लुनावत, प्रसाद बारटक्के, प्रमोद लाहोटी, राजेंद्र कासट, पंकज लाहोटी, मनोज लोया, सुदीप भट्टड, संजय कासट, चंद्रकांत कासट, पुरुषोत्तम लाहोटी, पवन लाहोटी, सौरभ लाहोटी, रोहन सारडा, गोकुळ सारडा, उदय राठी, आनंद करवा, पुष्कर वैष्णव, जितेश जैन, चेतन शहा, सचिन कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते.
राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी साताऱ्यातील व्यापारी पेठेमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना महायुतीचे उमेदवार सुपुत्र खा. उदयनराजे भोसले यांचे प्रचार पत्रक सर्व व्यापाऱ्यांना वाटप केले. त्यांच्या या गोष्टीची चांगलीच चर्चा सातारा शहरात होत आहे.