सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; जूनचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

0
308
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातारा जिल्ह्यातील हजारो लाडक्या बहिणींना आजही लाभ मिळतआहे. या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे. जून महिन्याचा हप्ता आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. “खरं तर जून महिन्याचे १५०० रुपये कधी येणार याकडे मागील अनेक दिवसापासून राज्यातील महिला वर्ग वाट बघत आहे. महिना उलटूनही जूनचा हप्ता न आल्याने महिलांमध्ये चिंतेचं वातावरण होते. अखेर आजपासून जून महिन्याचे १५०० रुपये जमा होणार असून यामुळे सातारा जिल्ह्यातीलही लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, ज्या महिलांनी पात्र नसतानाही अर्ज भरला आहे अशा महिलांना वगळण्याचे काम सरकार कडून सुरु आहे. आत्तापर्यंत लाखो महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलं आहे. यामध्ये सरकारी कर्मचारी असलेल्या महिला, इन्कम टॅक्स भरणाऱ्या किंवा घरी चारचाकी वाहन असलेल्या महिलांचा समावेश आहे. अशावेळी तुम्हाला पैसे आले की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला फक्त आधार लिंक्ड बँकेच्या अकाउंटमध्ये जाऊन बॅलेंस चेक करायचा आहे. किंवा ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये तुम्हाला पैसे आले की नाही हे चेक करु शकतात.

लाडकी बहीण योजनेची घोषणा जून 2024 मध्ये अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत करण्यात आली आणि त्यानंतर या योजनेची अत्यंत जलद गतीने यशस्वीरित्या अंमलबजावणी करत जुलै 2024 पासून अर्ज सुरू करण्यात आले. ही योजना सरकारच्या पद्धतीने योग्यरित्या अंमलबजावणी होत असली तरी या योजनेवर वेळोवेळी टीका करण्यात आली आणि ही योजना वादाच्या भवऱ्यात देखील सापडली. अखेर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट 2024 रोजी देण्याचे निश्चित करण्यात आले.

काय आहे अदिती तटकरे यांचं ट्विट?

आदिती तटकरे यांनी याबाबत काल रात्री ट्विट करत म्हंटल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.