महाविद्यालय स्तरावर प्रलंबित शिष्यवृत्तीच्या अर्जासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या महत्वाच्या सूचना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले शिष्यवृत्तीचे अर्ज संबधीत महाविद्यालयांनी समाज कल्याण विभागाकडे पडताळणी करून शिष्यवृत्ती अदागाई होणेकामी सादर करावेत, अशा सूचना समाजकल्याण विभागाकडून वारंवार देण्यात आलेल्या आहेत. परंतु, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये नोंदणी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती अल्प असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दि.18 मार्च 2024 पुर्वी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून शिष्यवृत्ती अदागाई होणेकामी पाठविण्यात यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी शिष्यवृत्ती/शिक्षण फी, परिक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसाईक पाठ्यक्रमास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेचे अनुजाती प्रवर्गातील महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नुतनीकरण व नवीन अर्ज नोंदणी दि. 11 ऑक्टोबर 2023 पासून सुरूवात करण्यात आलेली आहे. महाविद्यालयांनी समाज कल्याण विभागाकडे पडताळणी करून शिष्यवृत्ती अदागाई होणेकामी सादर करावेत, अशा सूचना समाजकल्याण विभागाकडून वारंवार देण्यात आलेल्या आहेत.

समाज कल्याण विभागाच्या सूचनानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहान करण्यात आले आहे. सन २०२३-२०२४ या वर्षामधील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालय/ महाविद्यालय प्रशासनावर राहिल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. तसेच ज्या महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीचे अर्ज भरले आहेत, त्या महाविद्यालयांनी सदर अर्ज महाविद्यालयस्तरावर न ठेवता सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास दि. 18 मार्चपुर्वी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत.