सातारा प्रतिनिधी | भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघात राबविण्यात आला होता. सातारा जिल्ह्यातील आठही मतदारसंघामध्ये प्रारुप मतदार यादी 6 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. 29 ऑगस्टपर्यंत नवीन नोंदणी हरकती तसेच फॉर्म दुरुस्ती करुन मतदार यादी तयार करण्यात आली आहे. तरी मतदारांनी आपली नावे तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मतदार यादीचा डाटा व छापील मतदार यादी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना देण्यात आली आहे. तसेच satara.nic.in या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, तहसील कार्यालय व प्रांत कार्यालय व जिल्हा कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर देखील प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी आपली नावे तपासून घ्यावीत, असे आवानही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.
असे मतदारसंघ निहायक आहे मतदार
255- फलटण तालुक्यात 1 लाख 73 हजार 67 पुरुष मतदार, 1 लाख 65 हजार 925 स्त्री मतदार तर तृतीयपंथी 14 असे एकूण 3 लाख 39 हजार 6 मतदार आहेत. 256- वाई तालुक्यात 1 लाख 73 हजार 168 पुरुष मतदार, 1 लाख 72 हजार 122 स्त्री मतदार तर तृतीयपंथी 7 असे एकूण 3 लाख 45 हजार 297 मतदार आहेत. 257- कोरेगाव तालुक्यात 1 लाख 61 हजार 50 पुरुष मतदार, 1 लाख 55 हजार 830 स्त्री मतदार तर तृतीयपंथी 3 असे एकूण 3 लाख 16 हजार 883 मतदार आहेत. 258- माण तालुक्यात 1 लाख 82 हजार 250 पुरुष मतदार, 1 लाख 73 हजार 162 स्त्री मतदार तर तृतीयपंथी 10 असे एकूण 3 लाख 55 हजार 422 मतदार आहेत.
259- कराड उत्तर तालुक्यात 1 लाख 54 हजार 56 पुरुष मतदार, 1 लाख 48 हजार 823 स्त्री मतदार तर तृतीयपंथी 7 असे एकूण 3 लाख 2 हजार 886 मतदार आहेत. 260- कराड दक्षिण तालुक्यात 1 लाख 58 हजार 300 पुरुष मतदार, 1 लाख 52 हजार 720 स्त्री मतदार तर तृतीयपंथी 30 असे एकूण 3 लाख 11 हजार 50 मतदार आहेत. 261- पाटण तालुक्यात 1 लाख 55 हजार 308 पुरुष मतदार, 1 लाख 51 हजार 96 स्त्री मतदार तर तृतीयपंथी 3 असे एकूण 3 लाख 6 हजार 407 मतदार आहेत. 262- सातारा तालुक्यात 1 लाख 70 हजार 982 पुरुष मतदार, 1 लाख 9 हजार 777 स्त्री मतदार तर तृतीयपंथी 35 असे एकूण 3 लाख 40 हजार 794 मतदार आहेत. असे एकूण जिल्ह्यात 26 लाख 17 हजार 745 मतदार आहेत.