संतोष पाटील साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी; जिल्हाधिकारी जितेंद्र डूडींची पुण्याला बदली

0
4

सातारा प्रतिनिधी । साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (Jitendra Dudi) यांनी आज पुणे येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी संतोष पाटील (Santosh Patil) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

जितेंद्र डुडी हे मूळचे जयपूर (राजस्थान) येथील असून ते 2016 मधील बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सुरुवातीला त्यांची झारखंडमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त झाली होती. केंद्र शासनाकडे सहाय्यक सचिव म्हणून काम केले आहे. 2018 मध्ये केंद्र शासनाकडून महाराष्ट्र केडरकडे त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे प्रांताधिकारी म्हणूनही काम केले आहे. ७ जून २०२३ रोजी जितेंद्र डूडी यांनी साताऱ्याचा जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला होता. दरम्यान, आज त्यांच्या बदलीचे देण्यात आले.

साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या जागी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची बदली करण्यात आली आहे. संतोष पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील उंडेगाव, ता. बार्शी येथील रहिवाशी आहेत. १९९६ मध्ये ते राज्य प्रशासकीय सेवेत सेवेत रुजू आले. आतापर्यंत त्यांनी राज्यात विविध ठिकाणी काम केले आहे.

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरू झाले आहे. गुरुवारी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची बदली करण्यात आली. पुणे जिल्हाधिकारीपदाचा डूडी हे आता पदभार घेणार आहेत. तर सातारा जिल्हाधिकारीपदी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.