मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/ पाणंद रस्त्यांची कामे तात्काळ सुरु करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । ग्रामपंचायत विभागाकडे मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी 237 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापैकी 95 प्रस्तांवाना शेतकऱ्यांची संमती मिळणे बाकी आहे. ज्या कामांना अद्यात शेतकऱ्यांची संमती नाही त्यांची संमती घेण्याचे काम 31 ऑगस्टपर्यंत मार्गी लावावे यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक यांचे संयुक्त आदेश काढावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

पाटण तालुक्यातील मातोश्री ग्रामसद्धी पाणंद रस्ते, रोजगार हमी योजनेंतर्गत यांचा आढावा जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अर्चना वाघमळे, तहसिलदार अनंत गुरव, गट विकास अधिकारी श्री. शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटण तालुक्यातील मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते, रोजगार हमी योजनेंतर्गत सिमेंट रस्ते, पेवर ब्लॉक बसविणे आदी कामांचा आढावा जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी घेतला. सदरची कामे तात्काळ सुरु करावीत ज्या ठिकाणी अद्याप शेतकऱ्यांची मान्यता मिळालेली नाही त्या ठिकाणी यंत्रणांनी पाठपुरावा तात्काळ मान्यता मिळवावी. या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी जल जीवन मिशन अंतर्गच्या कामांचाही आढावा घेतला. ते म्हणाले, ज्या कामांचे अंदाजपत्रके होऊन त्यांना मान्यता मिळाली अशी कामे लवकरात लवकर पूर्ण करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.