सातारा प्रतिनिधी | लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 25 मधील तरतुदींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा जितेंद्र डुडी यांनी भारत निवडणुक आयोगाच्या पूर्व मान्यतेने लोकसभा मतदार संघासाठी मतदान क्षेत्राकरिता किंवा मतदान समुहाकरीता मतदान केंद्र उपलब्ध केली आहेत.
यामध्ये- 45 सातारा लोकसभा मतदार संघातर्गत 256- वाई विधानसभा मतदार संघातर्गत- 454, 257- कोरेगाव विधानसभा मतदार संघामध्ये- 355, 259- कराड उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये- 338, 260- कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये- 309, 261- पाटण विधानसभा मतदार संघामध्ये – 409, 262- सातारा विधानसभा मतदार संघामध्ये – 445 मतदान केंद्रे आहेत.
तर 43 माढा लोकसभा मतदार संघातर्गत 255- फलटण विधानसभा मतदार संघामध्ये- 341, 258- माण विधानसभा मतदार संघामध्ये- 368 मतदान केंद्रे आहेत. तसेच 1500 पेक्षा जास्त मतदार संख्या झाल्याने खालील मतदार संघामध्ये तात्पुरती मतदान केंद्रे देखील मंजूर झाली आहेत. यामध्ये कराड उत्तर- 1, माण- 1, व कराड दक्षिण- 4