सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघासाठी १०९ उमेदवारांचे भवितव्य येत्या बुधवारी मशीन बंद होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील ३१६५ मतदान केंद्रांसाठी १६२६१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मतदारांनी निर्भयपणे सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत निर्भयपणे मतदान करावे या मतदान प्रक्रियेमध्ये गैरप्रकार टाळले जावेत असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत केले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डूडी यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, “सातारा जिल्ह्यात सिविजील ॲपवर १०७ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आचारसंहिता भंगाच्या दृष्टीने त्याची सत्यता पडताळून त्या तक्रारी निकाली काढण्यात आले आहेत.
१९५० या नंबरवर ११ तक्रारी दाखल झाल्या त्या तक्रारीचे सुद्धा निवारण करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने शेवटचे 24 तास महत्त्वाचे असून दारू पैशाचा गैरवापर मतदारांवर दबाव इत्यादी तंत्राचा वापर केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी विशिष्ट चेक पोस्ट तयार करण्यात आलेले आहेत तसेच जेथे पैशाचा वापर होऊ शकतो अशी ४८ गावे आठ विधानसभा मतदारसंघातून निश्चित करण्यात आली आहेत. त्याच्यावर ड्रोनच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष राहणार आहे.
१३ कोटी ११ लाख ८४ हजार २३६ चा मुद्देमाल जप्त
सातारा जिल्ह्यात यंदा विधानसभा निवडणुकांच्या कालावधीमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय कारवाई करण्यात आली आहे जिल्ह्यात एकूण दारू पैसे वाटप या संदर्भाने १३ कोटी ११ लाख ८४ हजार २३६ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये १ कोटी ६ लाख रुपयांची लिकर व १ कोटी ५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे फलटणमध्ये १८ कोटी ८९ लाख, वाईमध्ये १ कोटी ५४ लाख, कोरेगावमध्ये ३२ लाख २७ हजार, माणमध्ये १५ लाख, कराड दक्षिणमध्ये ७ कोटी ९९ लाख, कराड उत्तरमध्ये ६ कोटी १७ लाख, पाटणमध्ये १६ लाख ९४५ व साताऱ्यामध्ये २ कोटी २८ लाख असे एकूण १३ कोटीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.
३ हजार ९७ पोलीस कॉन्स्टेबल व २९४० होमवर्डची नेमणूक
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील ३ हजार ९७ पोलीस कॉन्स्टेबल व २९४० होमवर्ड यांची नेमणूक करण्यात आली आहे केंद्रीय निमलष्करी दलाच्या ८ कंपन्या व राज्य राखीव दलाची एक कंपनी ही विधानसभा निवडणुकांसाठी तैनात राहणार आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरता जिल्ह्यात ४३६ क्षेत्रीय अधिकारी ३९५६ केंद्राध्यक्ष ११८६९ इतर कर्मचारी असे १६२६१ कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.
महिला बचत गटाच्या २००० महिला कर्मचारी ८ विधानसभा मतदारसंघात नियुक्त
मतदान केंद्रांवर रांगा लागू नयेत म्हणून एकावेळी १ मतदान केंद्रावर चार मतदार मतदान करू शकतील अशी व्यवस्था आहे. सायंकाळी सहा पर्यंत येणाऱ्या मतदारांना टोकन दिले जाणार आहेत. मतदान केंद्रांवर औषधोपचार किट खुर्च्यांची व्यवस्था तसेच इतर सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे कोठेही रांगा लागणार नाहीत याची काळजी घेण्यात येत आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना केल्या असून लोकांचे प्रबोधन वेळोवेळी करण्यात आले आहेत. तसेच सातारा जिल्ह्यात महिला बचत गटाच्या २००० महिला कर्मचारी ८ विधानसभा मतदारसंघात नियुक्त आहेत त्या मतदानाच्या दिवशी दिवसातून तीन वेळा जाऊन किती टक्के मतदान झाले याचा घरोघरी आढावा घेणार आहेत.
८५ वर्षाच्या वरील १७८७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ८५ वर्षाच्या वरील १९१४ मतदारांपैकी १७८७ मतदारांनी मतगृह मतदानाचा हक्क बजावला आहे तसेच पीडब्ल्यूडी मतदार ३२३ असून पैकी ३११ जणांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे तसेच दिव्यांग आणि ज्येष्ठ व्यक्तींसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एनएसएस व एनसीसी चे जवान नियुक्त करण्यात येणार आहेत.