सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) (3) अन्वये दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमाव बंदी आदेश जारी केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ज्या लोकांनी शांततेचा मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करायचा असेल, त्याचवेळी पोलीस विभागाची (पोलीस अधिक्षक/संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक) यांची लेखी पूर्व परवानगी घेतल्यासच त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
37 (1) अंतर्गतचा हा आदेश ज्यांना हातात लाठी किंवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही. अशा वृध्द अथवा अपंग इसमांना लागु असणार नाही. त्याचप्रमाणे मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) अन्वये पांच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यांस सबंधित स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या कार्यालयाची पुर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास या आदेशान्वये बंदी घालीत आहे. हा आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणूका, प्रेत यात्रा यांना लागु असणार नाही.
काय आहे 37(1) व (3) कलम?
मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) मधील अधिकाराचा वापर करुन या आदेशान्वये पुढील कृत्यांना बंदी घालण्यात येते. यामध्ये अ) शस्त्र, सोटे, भाले, तलवारी, बंदुका, सुरे, लाठया व काठया किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील अशी कोणतीही हत्यारे अथवा वस्तु घेऊन फिरणे,
ब) अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा द्रव्ये बरोबर घेऊन फिरणे.
क) दगड अगर इ. अस्त्रे किंवा शस्त्रे सोडावयाची अगर फेकावयाची हत्यारे,साधने इ.तयार, जमा करणे,आणि बरोबर नेणे,
ड) कोणत्याही इसमाच्या चित्रांचे प्रतिकात्मक, प्रेताचे किंवा पुढा-यांच्या चित्रांचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करण,
इ) सार्वजनिक रित्या ओरडणे, किंवा विक्षिप्तपणे हावभाव करणे,
ई) सभ्यता अगर नितीमत्ता विरुध्द असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे आणि तशी चिन्हे, चित्रे, फलक, इ.लावणे किंवा इतर कोणतेही असे जिन्नस अगर वस्तु तयार करणे अगर त्यांचा प्रसार करणे या कृत्यांना बंदी घालीत आहे.