दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे उपक्रम अत्यंत स्तुत्य- जितेंद्र डूडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी संस्थेच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेने राबविलेले उपक्रम अत्यंत स्तुत्य असून प्रशासनिक स्तरावर संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करु. याचबरोबर शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याचे आश्‍वासन डूडी यांनी दिले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक करपे, अप्पर पोलीस अधीक्षक सौ. आंचल दलाल, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ढेब यांची प्रमुख उपस्थिती होती.

संस्थापक-अध्यक्ष अजय पवार म्हणाले, दिव्यांगांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. दिव्यांग माता-भगिनींनाही येणार्‍या अडचणी आम्ही शासन दरबारी मांडत आहोत. वेळप्रसंगी मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही निवेदने देऊन, आंदोलने करुन दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी मी कटिबद्ध आहे. ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत, त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु असून जिल्हाधिकारी या मागण्यांबाबत सकारात्मक आहेत.

यावेळी शैलेंद्र बोर्डे, अमोल निकम, अमोल भातुसे, रवी गाडे, पांडुरंग शेलार, संजय प्रकाशे, प्रेमनाथ कदम, भाजप दिव्यांग सेल आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक खडंग, सुरेश बाबा माने, नामदेव इंगळे, अविनाश कुलकर्णी, महिला पदाधिकारी सौ. मंदाकिनी गाडे, सौ. सुनंदा ढेब, सौ. लतिका जगताप, सौ. शोभा मोरे, श्रीमती सुनीता ओंबळे, सौ. शालन लोंखडे, सौ. माधुरी देशमुख, श्रीमती चंपाबाई क्षीरसागर, प्रहार दिव्यांग क्रांतीच्या तालुकाध्यक्ष समीना शेख तसेच संस्थेचेे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. अमोल निकम यांनी प्रास्ताविक केले, रवी गाडे यांनी आभार मानले.