कराड प्रतिनिधी | कराड येथील शेती उत्पन्न बाजार समिती आवारात यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे शेतकऱ्यांना याचा लाभ होईल या दृष्टीने चांगल्या पद्धतीने आयोजन करावे. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे शेतकऱ्यांना याचा लाभ होईल या दृष्टीने चांगल्या पद्धतीने आयोजन करावे. या प्रदर्शनाला प्रशासनाचे सहकार्य राहील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
कराड येथे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची सभा पार पडली. या सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी समिर पवार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, संचालक नितीन ढापरे, राजेंद्र चव्हाण, विजयकुमार कदम आदी उपस्थित होते.
कृषी प्रदर्शनामध्ये सेंद्रीय शेतीबाबत मोठ्या प्रमाणात जनजनगृती करावी, असे सांगून जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, विविध कृषी उत्पादनावर आधारित विविध गावांमध्ये ठराविकच उत्पादन घेण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून. याबाबतही प्रदर्शनामध्ये जनजागृती करावी. प्रदर्शनामध्ये सेंद्रीय कृषी मालाचे जास्तीत जास्त स्टॉल उभे करुन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करावे.