खोटा स्क्रीनशॉट पाठवून ‘त्यानं’ चक्क 30 लाखांचा नेला जेसीबी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | तीस लाखांचा जेसीबी खरेदी करत असल्याचे सांगून एनईएफटी स्क्रीनशॉट बनावट पाठवून जेसीबी पैसे न देताच नेण्यात आला. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजीत मोहन घोरपडे (रा.निमसाखर, ता. इंदापूर, जि.पुणे), सोहेल शौकत शेख (रा.अंथुर्णे, ता.इंदापूर, जि.पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. माजीद फारूख शेख (वय २७, रा. गुरुवार पेठ, सातारा) याचा जेसीबी खरेदीसाठी वरील संशयित साताऱ्यात आले.

तीस लाखांचा व्यवहार ठरल्यानंतर संशयितांनी पैसे पाठविल्याचा एनईएफटी स्क्रीनशॉट पाठविला. मात्र, तो बोगस असल्याचे माजीदच्या लक्षात आले. त्याने जेसीबी परत मागितला असता जेसीबी पुन्हा देणार नाही, असे सांगून पुन्हा गावात आलास, तर मारून टाकीन, तसेच जेसीबी पेटवून देण्याची त्यांनी धमकी दिली. माजीद शेख याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे तपास करीत आहेत