जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचा भव्य एक्स्पो उद्यापासून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी व संपूर्ण देशभरात लोकप्रिय अशी जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवार, दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे. या स्पर्धेचा भव्य एक्स्पो शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट व शनिवार, दि. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी असा दोन दिवस आयोजित केला आहे. हा एक्स्पो दि. ३० ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ७ आणि दि ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या दरम्यान स्पर्धकांसाठी खुला असणार आहे.

शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील कै अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक संकुल येथे या भव्य एक्स्पोचे आयोजन केले असून या एक्स्पोचे उद्घाटन शनिवारी सकाळी ११ वाजता सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला अजिंक्यतारा सहकारी कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते हे देखील उपस्थित राहणार आहेत.

या एक्स्पोमध्ये स्पर्धेसाठी आवश्यक असणारे रेस किट स्पर्धकांना वितरित करण्यात येणार असून त्यामध्ये टी शर्ट, रनिंग बीब, संगणकीकृत टाईमिंग चिप इत्यादींचा समावेश आहे. त्यासाठी स्पर्धकांनी नांव नोंदणी केल्याचा पुरावा म्हणून त्यांना आलेला ई-मेल अथवा त्यांच्या मोबाईलवर आलेला मेसेज दाखवणे हे अनिवार्य आहे.