कोयना वसाहत येथे स्व. जयवंतराव भोसले स्मृती उद्यान कामाचे भूमिपूजन उत्साहात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कोयना वसाहत, ता. कराड येथे स्व. जयवंतराव भोसले स्मृती उद्यान साकारण्यात येणार आहे. या नियोजित स्मृती उद्यानाचे भूमिपूजन कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. कोयना वसाहत येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या नावाने स्मृती उद्यान साकारले जाणार आहे.

यावेळी डॉ. भोसले म्हणाले की, गावाच्या विकासाचा पुढील ५ ते १० वर्षाचा विकास आराखडा तयार करण्याची गरज आहे. गावातील प्रत्येकाला शुद्ध पिण्याचे पाणी, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण रक्षण याकडे लक्ष देणे गरजेचे असून, या कामात लोकसहभाग महत्वाचा आहे.

यावेळी भाजपाचे लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून करण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन, कोयना वसाहत सहकारी हौसिंग सोसायटीच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे, तसेच शिवराज हौसिंग सोसायटी येथील रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे उदघाटन व घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीने घेतलेल्या ट्रॅक्टरचे लोकार्पण डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कोयना वसाहतीच्या सरपंच सौ. सुवर्णा वळीव, उपसरपंच उमेश कुलकर्णी, कोयना हौसिंग सोसायटीचे चेअरमन व ग्रा. पं. सदस्य चंद्रशेखर पाटील, विनायक कुलकर्णी, सम्राट पाटील, सौ. रजनी गुरव, सौ. सुनिता भोसले, श्रीमती संगीता पाटील, श्रीमती कुसुम पुजारी, सौ. शितल जाधव, कोयना हौसिंग सोसायटीचे व्हा. चेअरमन किशोर जकाते, सदस्य अजित वरेकर, रमेश कुलकर्णी, तानाजी भोसले, वसंतराव पाटील, विरेंद्र टकले, दिलीप गुरव, धनाजी भोसले, श्रीमती वैशाली पाटील, श्रीमती पुष्पलता कदम, ग्रामविकास अधिकारी दिपक हिनुकले, सेक्रेटरी नितीन सांडगे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.