बिअर बार वाढविण्यासाठी जनतेनं मंत्रिमंडळात पाठवलं आहे का?; पाटणच्या शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटलांची शंभूराज देसाईंवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । पाटणला काय वाढले तर बिअरबार वाढले. यासाठी मंत्रिमंडळात पाठवले होते हे वाटत नाही. बार वाढविण्याचा कार्यक्रम त्यापेक्षा महाराष्ट्रही पाटणसारख्या दुर्गम भागात वेगळं काही वाढलं नाही. त्यामुळे हि वेगळी संस्कृती महाराष्ट्रात आणणारी हि लोकं महाराष्ट्र विकायला काढायच्या कामात आता गुंतलेली असल्याची टीका पाटण येथे शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे गटाचे नेते पालकमंत्री तथा उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर केली.

पाटण येथे शिवस्वराज्य यात्रेअंतर्गत आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जाहीर सभा पार पडली. यावेळी आमदार जयंत पाटील बोलत होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे, दीपक पवार तसेच पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित आहेत.

जयंत पाटील म्हणाले की, ही शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रातील जवळपास 60 ते 65 पेक्षा जास्त मतदार संघात जाऊन आली आहे. राज्यातील अतिशय दुर्गम अशा गडचिरोली पासून ते सावंतवाडी पर्यंत जवळपास सर्व जिल्ह्यात जाण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. राज्यभर फिरल्यावर खात्री झाली कि महाराष्ट्रातील वातावरण लोकसभेच्या पेक्षा अधिक सुधारलेले आहे. आज सर्व लोक हे भाजप सरकार घालवल पाहिजे असे म्हणत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर वातावरण वेगळं होत. बघता बघता निवडणूक सुरु झाली आणि महाराष्ट्रातील जनतेने आदरणीय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याची परिणीती महाराष्ट्रात भाजपचा ३१ ठिकाणी पराभव झाला. १० जागांच्या ऐवजी आपला ८ जागांवर विजय झाला आणि एक जागा सातारा जिल्ह्याची होती.

पिपाणी आणि तुतारी या दोन्ही चिन्हातील फरक न कळलेल्या आपल्या मतदारांनी ३७ हजार हि मते पापणीला घातली आणि आमची शिट ३५ हजाराच्या मताने पडली. १० पैकी जवळपास ९ ठिकाणी जनतेने शरद पवार यांच्या बाजूने कौल आला. महाराष्ट्रातील जनता पवार साहेबासारख्या ८४ वर्षाच्या योद्धाच्या पाठीशी आजही उभी राहत आहे. कारण स्वाभिमान हा मराठी माणसाच्या कणाकणात आहे.

रिझर्व्ह बँकेला पात्र पाठवून अजून सव्वा लाख कोटींचे कर्ज मागितले आहे

काल पर्वा महाराष्ट्र सरकारने रिझर्व्ह बँकेला एक पत्र दिले कि आम्हाला अजून सव्वा लाख कोटी रुपयांचे कर्ज द्यावे डिसेंबर पर्यंतचे दिवस काढायला. आठवड्याला चार ते सहा हजाराचा तख्ता काढून त्याचे पत्र पाठवले आहे. महाराष्ट्रातील अनेक कर्मचाऱ्याचे पगार हि बंद व्हायला लागले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात हे घरी गेल्यावर पगाराला पैसे ठेवतील कि नाही अशी मानसिकता या सत्तेत असणाऱ्या लोकांची आहे.