माण-खटावमध्ये गोरे बंधूंनी केला करेक्ट कार्यक्रम; जयकुमार गोरे विजयी प्रभाकर घार्गे पराभूत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यातील कायम दुष्काळी भागातील माण-खटाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार जयकुमार गोरे चौथ्या विजयासाठी निवडणूक लढवली. आणि 49 हजार 478 मतांची आघाडी घेत पुन्हा विजय मिळवला आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा त्यांनी द्रूण पराभव केला आहे.

माण खटाव विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना 1 लाख 50 हजार 021 मते पडली असून 1 लाख 346 इतकी मते प्रभाकर घार्गे यांना पडली आहेत. या मतदार संघात निवडणुकीत घार्गे यांच्या पाठीशी मोठ्या नेत्यांची ताकद उभी होती. पण, येथे आघाडीतील नाराज शेखर गोरे आता बंधू विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्यासोबत गेले. शेखर गोरेंनी बंधू जयकुमार गोरे यांचा प्रचार देखील केला. आणि दोन्ही गोरे बंधूंनी घार्गे यांचा करेक्ट कार्यक्रमी केला.

जयकुमार गोरे यांनी मारला आमदारकीचा चौकार

माण विधानसभा मतदारसंघात 2009 च्या विधानसभा निवडणुकीवेळी जयकुमार गोरे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाटपात ती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला होता. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. 2014 ची विधानसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्यानं काँग्रेसकडून जयकुमार गोरे आमदार झाले होते. 2014 ते 2019 ही टर्म संपण्यापूर्वीच जयकुमार गोरे यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या चिन्हावर 2019 ची विधानसभा निवडणूक जयकुमार गोरे यांनी लढवली आणि ते विजयी झाले. ही निवडणूक त्यांची चौथी निवडणूक होती. या निवडणुकीत जयकुमार गोरे यांनी विजय मिळवत चौकार मारला आहे.

जयकुमार गोरेंचा 2019 ला झालं होता निसटता विजय

माण विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीवेळी तिरंगी लढत झाली. हि निवडणूक आजही या मतदार संघातील नागरिकांच्या चांगलीच लक्षात आहे. कारण या ठिकाणी भाजपकडून जयकुमार गोरे, शिवसेनेकडून शेखर गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाकर देशमुख उमेदवार होते. माण मतदारसंघातील या निवडणुकीत जयुकमार गोरे यांना 91 हजार 469 मते मिळाली होती तर प्रभाकर देशमुख यांना 88 हजार 426 मते मिळालेली. तर, शेखर गोरे यांना 37 हजार 539 मतं मिळाली होती. या निवडणुकीत 3 हजार 43 मतांची आघाडी घेतली. आणि जयकुमार गोरे यांना त्यावेळी तिरंगी लढतीचा फायदा झाला. आता देखील बंधू शेखर गोरे यांनी साथ दिल्याने जयकुमार गोरे यांना विजयी होता आले.