सातारा प्रतिनिधी । “रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांनी लोकसभेला कोणाचं काम केलं; हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसेच त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये काय केलं; हे सर्व जनतेला माहित आहे; अशा शब्दात भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी निशाणा साधला.
सातारा जिल्ह्यातील दहिवडी ‘लाडकी बहीण सन्मान सोहळा’ नुकताच पार पडला. यावेळी भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे जेष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी आमदार गोरे म्हणाले, कि तीन पक्षाची आपली युती आहे. या युतीने अजूनपर्यंत कोणताही उमेदवार जाहीर केला नाही.
अजित पवार यांनी फलटणमधील विधानसभेचा उमेदवार कसा जाहीर केला? याबाबत मला माहिती नाही. आमदार दीपक चव्हाण हे अजित पवार गटातून उभे राहतील की नाही याबाबत मला शंका आहे. लोकसभेला माढा लोकसभा मतदारसंघात जो भाजपचा पराभव झाला त्यामध्ये ज्या ज्या लोकांचा हात आहे; ते युतीचे घटक आहेत असं आम्ही मानत नसल्याचे देखील गोरे यांनी सांगितले.