माणचा कोण मानकरी ठरणार? जयकुमार गोरेंविरोधात वस्ताद देणार ‘तगडा’ उमेदवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या आठ मतदारसघांत कोण होणार आमदार अशी चर्चा सुरु आहे तशी सर्वाधिक उमेदवार ज्या मतदारसंघातून इच्छुक आहेत त्या माण खटाव विधानसभा मतदारसंघात देखील अशीच चर्चा आहे. या विधानसभा मतदार संघात भाजपकडून (BJP) राजकारणातील डावपेच खेळण्यात पैलवान समजल्या जाणाऱ्या आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी दंड थोपटले आहेत. 2019 च्या हाय व्होल्टेज ठरलेल्या मान खटावच्या आमदारकीच्या निवडणुकीला विरोधकांच्या एकजुटीला फोडून काढत जयकुमार गोरे यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र, यावेळेस त्यांच्यापुढे राजकारणातील आखाड्यातले वस्ताद म्हणून समजले जाणारे खासदार शरद पवार हे तगाडा उमेदवार देणार आहेत. सध्या पवार गटाकडून (NCP) माणचे नेते अभयसिह जगताप (Abhaysinh Jagtap) यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

माण विधानसभा मतदारसंघावर 2009 पूर्वी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते सदाशिव तात्या पोळ यांचे वर्चस्व होते. 2009 च्या विधानसभा निवडणुकीवेळी हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गात आला, त्यापूर्वी तो एससी प्रवर्गासाठी राखीव होता. 2009 पासून जयकुमार गोरे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. यावेळी माण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत या जागेवरुन निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. यामध्ये प्रभाकर देशमुख, अनिल देसाई आणि अभयसिंह जगताप यांच्याकडून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. तसेच सभा आणि बैठका देखील घेऊन तालुक्यात तुतारीचा आवाज गावागावात आणि गल्लीबोळात पोहचवला आहे.

तर, दुसरीकडे जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांचे बंधू शेखर गोरे सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत. शेखर गोरे यांनी गेल्यावेळी निवडणूक लढवली होती. यावेळी ते निवडणूक लढवणार की नाही याबद्दल चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे असल्याने देशमुख आणि देसाईपैकी अभयसिह जगताप यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

जयकुमार गोरे आमदारकीचा चौकार मारणार का?

माण विधानसभा मतदारसंघात 2009 च्या विधानसभा निवडणुकीवेळी जयकुमार गोरे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा वाटपात ती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला होता. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. 2014 ची विधानसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्यानं काँग्रेसकडून जयकुमार गोरे आमदार झाले होते. 2014 ते 2019 ही टर्म संपण्यापूर्वीच जयकुमार गोरे यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या चिन्हावर 2019 ची विधानसभा निवडणूक जयकुमार गोरे यांनी लढवली आणि ते विजयी झाले. ही निवडणूक त्यांची चौथी निवडणूक असणार आहे.

जयकुमार गोरेंचा 2019 ला निसटता विजय

माण विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीवेळी तिरंगी लढत झाली. हि निवडणूक आजही या मतदार संघातील नागरिकांच्या चांगलीच लक्षात आहे. कारण या ठिकाणी भाजपकडून जयकुमार गोरे, शिवसेनेकडून शेखर गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाकर देशमुख उमेदवार होते. माण मतदारसंघातील या निवडणुकीत जयुकमार गोरे यांना 91 हजार 469 मते मिळाली होती तर प्रभाकर देशमुख यांना 88 हजार 426 मते मिळालेली. तर, शेखर गोरे यांना 37 हजार 539 मतं मिळाली होती. या निवडणुकीत 3 हजार 43 मतांची आघाडी घेतली. आणि जयकुमार गोरे यांना त्यावेळी तिरंगी लढतीचा फायदा झाला.

खा. मोहिते पाटलांनी घेतलेल्या बैठकीत नेमकं काय घडलं?

सध्या माण खटावविधानसभा मतदार संघात खूप घडामोडी घडत आहरेत. भाजपच्या जयकुमार गोरे यांच्या विरोधात तगडा उमेदवार येण्यासाठी इच्छुकांकडून गुप्त बैठका घेत चर्चा केल्या जात आहेत. यावेळेस विरोधात असलेल्या इच्छुकांचे जयकुमार गोरे यांचा पराभव हाच एकमेव उद्देश आहे. या अनुषंगाने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी खटाव तालुक्यातील एका नेत्याच्या निवासस्थानी एक बैठक घेतली आहे. या बैठकीचे विशेष म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा या बैठकीस उपस्थित होते. या मतदारसंघात इच्छुक असलेले प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे, अनिल देसाई, रणजित देशमुख, अभय जगताप हि सर्व मंडळी देखील या बैठकीस हजर होती. या दोन्ही नेत्यांनी सर्वांची मते जाणून घेतल्याचॆ माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

यावेळी झालेल्या बैठकीस प्रभाकर देशमुख यांनी उमेदवारीवर आपला दावा सांगितला आहे. इतकेच नाही तर त्यांनी मागील निवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतांचीच आकडेवारीच सादर केली. त्यांच्यानंतर प्रभाकर घार्गे यांनी देखील यावेळी खटाव तालुक्याला संधी मिळायला हवी, असे सांगत त्यांना दिल्या गेलेल्या शब्दाची आठवण करून दिली आहे. अनिल देसाई आणि अभय जगताप यांनीही यावेळी लढत देण्याची तयारी केली असून, त्यांनीही उमेदवारी आपल्यालाच मिळायला हवी असा आग्रह धरला. रणजित देशमुख यांनी या बैठकीत ही जागा काँग्रेसला सोडावी, असे मत व्यक्त केले. यावर श्री. घार्गे आणि देसाई यांनी जागावाटपात तिकीट काँग्रेसला गेले, तर रणजित देशमुख आम्हाला चालतील, असे म्हटले. बैठकीस उपस्थितांशी चर्चा अकेल्यानंतर खासदार मोहिते पाटील यांनी जो काही निर्णय आहे तो खासदार शरद पवार घेणार असून त्यांना याबाबत माहिती देईल जाणार असल्याचे सागिंतले असल्याची माहिती मिळत आहे.