सातारा प्रतिनिधी । २८ जुलै हा दिवस जागतिक कावीळ दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने समाजामध्ये कावीळ आजाराविषयी जनजागृती व्हावी यसाठी जिल्हा रुग्णालय सातारा येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राहुल देव खाडे, डॉ.सुभाष कदम, डॉ.राहुल जाधव, डॉ.रामचंद्र जाधव, डॉ.चंद्रकांत काटकर, सहाय्यक अधीपरीचारिका प्रतिभा चव्हाण, प्रा.अमोल देसाई आदी उपस्थिती लावली.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे महाले की, कावीळ हा आजार एच.आय.व्ही पेक्षाही घातक आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी म्हणून कावीळ प्रतिबंधात्मक लस घेणे गरजेचे आहे. ‘ब’ प्रकारच्या कावीळ करिता २४ तासाचे आत पोस्ट एक्सपोजर प्रोफेल्याक्सिस देखील उपलब्ध आहे. यानंतर सर्व मान्यवरांचे हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखऊन रॅलीला मार्गस्थ केले.
सदर रॅलीमध्ये नर्सिंग कॉलेजचे १०० विद्यार्थी सह जिल्हा रुग्णालय सातारा मधील अधिकारी, कर्मचारी, विविध अशासकीय संस्थेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे कार्यक्रम अधिकारी श्री. हेमंत भोसले यांनी केले. आभार जिल्हा कावीळ नियंत्रण कार्यक्रम च्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ रूपाली कदम यांनी मानले.