“कशाला हवंय आरक्षण,” असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंना जरांगे पाटलांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । “कशाला हवंय आरक्षण,” असं म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना आरक्षणाची गरज नाही बाकीच्यांना आहे. याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. गोरगरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे. जे त्यांना वैभव मिळालं ते मराठ्यांच्या जीवावर मिळाले हे लक्षात ठेवावे. एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची झळ काय करणार? त्यांना ती कळणार नाही. गोरगरिबांच्या भावना जाणून घ्या. प्रत्येक वेळी तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही. राज ठाकरेंच्या गाडीवर सुपारी फेकणारे मी बघितले नाहीत पण राज्यात आंदोलन सुरू नाहीत. फडणवीसांनी सुपारी घेतला सारखे आंदोलन करणे, रॅली काढणे, यात्रा काढणे बंद करावे. अजूनही मराठा समाजात ताकद असल्याचे प्रत्त्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंच्या टीकेला दिले.

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची काल सातारा जिल्ह्यात शांतता रॅली पार पडली. या रॅलीनंतर जाहीर सभा सुरू असतानाच जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्यानंतर त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. उपचारानंतर जरांगे पाटील आजपुण्याकडे रवाना झाले त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, गाड्या फोडणाऱ्यांच्या विचारांना थोडंच राज्य चालतं. दंगली होणार नाहीत. आम्हाला कोणीही कोणत्या पक्षाचा आहे असं म्हटलं जातं. पण मराठा समाजाकडून राज्यात कोणताही आंदोलन सुरू नसल्याचे जरांगे पाटील यांनी म्हंटले.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

महाराष्ट्रासारख्या राज्याला आरक्षणाची गरज नाही. शिक्षणापासून ते नोकऱ्यापर्यंत इतकं सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे. मात्र महाराष्ट्रात भूमिपुत्रांना नोकऱ्या, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. मग, तो ओबीसी असो किंवा मराठा. कुठल्याही जातीचा असो, महाराष्ट्रात मुला-मुलींना चांगलं शिक्षण, रोजगार मिळाला पाहिजे. यात जात येते कुठे? मला जातीतील काही कळत नाही. माझ्याकडे याचं उत्तर नाही. महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे आरक्षणाची गरजच नाही. महाराष्ट्रात किती शैक्षणिक संस्था आहे? तिथे आरक्षण आहे का?. नकिती जातींना मिळणार? किती नोकऱ्या उपलब्ध होणार? हे पण आपण तपासणार आहोत का? असा प्रश्न राज ठाकरेंनी केला. राज्यात सध्या सुरु असलेलं मराठा आणि ओबीसी राजकारण हे फक्त मतांच राजकारण आहे. प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घ्यायला हवी. हे आपल्याला मूर्ख बनवतायत. याने हाताला काही लागणार नाही असं राज ठाकरेंनी म्हंटल. मराठा-ओबीसी हा वाद समाजात विष कालवण्याचा प्रकार आहे असा आरोपही राज ठाकरेंनी केला.

“दाढी राखणं हे मर्दाचे लक्षण”; नितेश राणेंवर जरांगे पाटलांची टीका

यावेळी मनोज जरांगे-पाटील यांनी नितेश राणे यांच्या टिकेवरून राणेंवर निशाणा साधला. यावेळी जरांगे-पाटील म्हणाले, त्यांनी सर्वच दाढी राखणाऱ्यांवर आक्षेप घेतला असेल. दाढी राखणं हे मर्दाचे लक्षण आहे. त्यांचा सन्मान करतो, परंतु, सन्मान शब्दाचा अर्थ त्यांना कळत नाही. ते बोलतात, पण शब्द फडणवीस यांचे आहेत. फडणवीस हे मराठ्यांच्या अंगावर मराठ्यांना सोडत आहेत.