सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत दैनंदिन घनकचरा संकलनावर देखरेख ठेवण्यासाठी ‘आयएसटी’ आधारीत प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ओला व सुका कचरा साठवण्यासाठी वापरण्यात येणार्या डस्टबिनवर विशिष्ट कोड लावण्यात येणार आहेत. पालिकेच्या कर्मचार्यांनी कचरा संकलन केल्यानंतर कोड स्कॅन केला जाणार आहे. ही सेवा निःशुल्क आहे.
‘आयएसटी’ आधारीत प्रणालीमुळे कोण कचरा देतो आणि कोण देत नाही, हे समजणार आहे. कचरा न देणार्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. फलटण शहरात ‘आयएसटी बेस्ड टेक्नॉलॉजी मॉनिटरिंग’ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी नगरपरिषदतर्फे सर्व मालमत्तांवर स्कॅनिफाय कोड लावण्यात येत आहेत.
दरम्यान, शर्टची घराघरामध्ये ओला व सुका कचरा साठवण्यासाठी नागरिक वापरत असलेल्या कचराकुंड्यांवर कोड लावण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे कचरा संकलन अधिक चांगल्या पद्धतीने होणार आहे. नागरिकांनी विलगीकृत कचरा द्यावा आणि स्वच्छता राखावी, असे आवाहन मुख्याधिकारी गायकवाड यांनी केले आहे.