कराड प्रतिनिधी । संतोष गुरव
कराडच्या रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमध्ये शनिवार, १८ रोजी एक अनोखी बस आगमन करणार आहे. जी विद्यार्थ्यांना अंतराळाच्या वैज्ञानिक जगात घेऊन जाणार आहे. भारतीय अंतराळ संस्था (इस्रो) (ISRO) ने ही बस तयार केली असून ज्यामधून विद्यार्थी चंद्र, सूर्य, ग्रह आणि तारे यांची जवळून वैज्ञानिक माहिती घेऊ शकता येणार आहे.
महाराष्ट्रभर फिरणारी ही बस विद्यार्थ्यांमध्ये अंतराळाची गोडी निर्माण करण्यासाठी डिज़ाइन केली गेली आहे. सकाळी ०९ वाजता ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत ही बस विद्यार्थ्यांसाठी खुली राहील. या बसच्या माध्यमातून विद्यार्थी अंतराळातील घडामोडींची माहिती आणि खगोल विज्ञानाचे ज्ञान मिळवू शकतील.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी कराड आणि परिसरातील विद्यार्थ्यांना आणि शाळांना या उपक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. ही बस विद्यार्थ्यांना अंतराळाच्या जगातील अनुभव घेण्यासाठी एक आदर्श संधी आहे.
महाविद्यालयात येणाऱ्या इस्रोची बस विद्यार्थ्यांनी अवश्य पहावी : प्राचार्य डॉ. मोहन राजमाने
सूर्य, चंद्र, तारे, आणि एकूणच अंतराळाचे विद्यार्थ्यांना कायम कुतूहल असते. त्याची वैज्ञानिक माहिती घेऊन अंतराळात सफरीचा अनुभव घेण्यासाठी भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) मोहीम हाती घेतली आहे. यासाठी एक बस तयार केली असून विद्यार्थ्यांना बसच्या माध्यमातून चंद्र, सूर्य, ग्रह, तारे, जवळून पाहण्याची, वैज्ञानिक माहिती घेता येणार आहे. हि बस शनिवारी कराडच्या रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमध्ये येणार आहे. सकाळी सकाळी ९ वाजता ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हि बस विद्यार्थ्यांना पाहता येणार असून हि बस जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पहावी असे आवाहन करण्यात आल्याची माहिती रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
‘मिशन मंगळ, चंद्रयान-2 मोहीम प्रकल्पांची सखोल माहिती
नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये खगोल विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी इस्रोने ही मोहीम सुरू केली आहे. इस्रोच्या इतिहासात आतापर्यंत राबविल्या गेलेल्या ‘मिशन मंगळ, चंद्रयान-2 मोहीम व इतर सर्व प्रकल्पांची सखोल माहिती या बसमध्ये चित्रफितीतून देण्यात येत आहे. त्यात रॉकेट कसे उडते? रॉकेटवर सॅटेलाईट कसे असेंबल केले जाते? आणि अंतराळात सोडले जाते, त्यांचे सर्व मॉडेल्स व अभ्यासपूर्ण टेक्निकल माहिती येथे विद्यार्थ्यांना मिळेल.