कराडला अवतरली ISRO ची अंतराळ बस; SGM च्या विद्यार्थ्यांनी घेतली उपग्रहांसह चंद्र, सूर्य अन् ताऱ्यांची माहिती

0
57

कराड प्रतिनिधी । कराड येथील रयत शिक्षण संस्थेच्या सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमध्ये आज एका अनोख्या बस आगमन झालं आहे. जी विद्यार्थ्यांना अंतराळाच्या वैज्ञानिक जगात घेऊन जाणार आहे. भारतीय अंतराळ संस्था (इस्रो) (ISRO) ने ही बस तयार केली असून ती सध्या कराडच्या SGM महाविद्यालयात दाखल झाली आहे. ज्यामधून चंद्र, सूर्य, ग्रह आणि तारे यांची वैज्ञानिक माहिती घेता येणार आहे.

महाराष्ट्रभर फिरणारी ही बस विद्यार्थ्यांमध्ये अंतराळाची गोडी निर्माण करण्यासाठी डिज़ाइन केली गेली आहे. आज कराडच्या SGM महाविद्यालयात सकाळी ०९ वाजता या बसच आगमन झालं. या बसमधील असलेले उपग्रह पाहण्यासाठी दिवसभर कराड आणि परिसरातील विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयातील युवक आणि युवतींनी गर्दी केली होती.

‘मिशन मंगळ, चंद्रयान-2 मोहीम प्रकल्पांची सखोल माहिती

नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये खगोल विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी इस्रोने ही मोहीम सुरू केली आहे. इस्रोच्या इतिहासात आतापर्यंत राबविल्या गेलेल्या ‘मिशन मंगळ, चंद्रयान-2 मोहीम व इतर सर्व प्रकल्पांची सखोल माहिती या बसमध्ये चित्रफितीतून देण्यात येत आहे. त्यात रॉकेट कसे उडते? रॉकेटवर सॅटेलाईट कसे असेंबल केले जाते? आणि अंतराळात सोडले जाते, त्यांचे सर्व मॉडेल्स व अभ्यासपूर्ण टेक्निकल माहिती येथे विद्यार्थ्यांना मिळत आहे.