पवार साहेबांचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत सातारच्या बच्चनकडून स्तुतीसुमनं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । बारामतीमध्ये पार पडलेल्या नमो महारोजगार मेळाव्याला एकाच व्यासपीठावर खासदार व ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार, डॉ. नीलम गोरे, मंगलप्रभात लोढा आले. या महारोजगार मेळाव्याच्या व्यासपीठावर भाषणासाठी शरद पवारांचं, अजित पवारांचं आगमन होताच बारामतीकरांनी एकच जल्लोष केला. याठिकाणी घडलेल्या घटनेवरून सातारचा बच्चन व बिग बॉस फेम मराठी अभिनेते किरण माने यांनी त्याच्या फेसबुक अकाउंटवरून नमो महारोजगार मेळाव्यातील शरद पवारांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेते किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, “आपल्या हद्दीत येऊन पोकळ माज करू पहाणार्‍या शत्रुच्या छावणीत घुसून त्याचा धुव्वा कसा उडवायचा… ही जिगरबाज वृत्ती पवारसाहेबांकडूनच शिकावी ! पवारांच्या वयात, या स्टेजवर बसलेल्या गावगुंडांची काय दयनीय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी.

साहेबांना पाहून जनतेने उत्स्फूर्तपणे केलेला जल्लोष प्रत्येकाच्या नशिबात नाही येत. साहेबांच्या सभेत यातल्या एकानेही अशी अचानक स्टेजवर जायची हिंमत करावी. ‘जरांगेंनी दिलेल्या शिव्या बर्‍या होत्या’ असं म्हणायची वेळ येईल. ही ‘चाल’ पावसातल्या सभेपेक्षा शंभरपट खतरनाक परीणाम करणार आहे यावेळी ! बख्खळ आले आन् मायंदाळ गेले गड्याहो… पवारसाहेब हा महाराष्ट्राच्या जनतेच्या काळजातला विषय हाय….” असे माने यांनी म्हंटले आहे.