सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीची घोसणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. या घोषणेपूर्वी महायुतीसह महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा निर्णय घेतला जात आहेत. तसेच लोकसभा मतदार संघावर देखील दावा केला जात आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाकडून दोन लोकसभा मतदार संघावर दावा करण्यात आला आहे. सातारासह माढ्याच्या जागा या गटाकडून मागण्यात आल्या आहेत. या दरम्यान, आज मुंबईत पार पडलेल्या बैठकीत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी सातारची जागा आपल्याकडेस असणार असून पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे म्हंटले आहे.
महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय चार-पाच दिवसांत होणार आहे. त्यापूर्वी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, रूपाली चाकणकर, आ. मकरंद पाटील आ. दीपक चव्हाण, माढा मतदारसंघाचे आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांच्या दोन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.
बैठकीत सातारा व माढा मतदारसंघाच्या अनुषंगाने सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेवेळी हे दोन्ही मतदार संघ राष्ट्रवादीकडेच राहावे, असा पदधकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जोर धरला आणि आग्रह देखील केला. यावेळी १९९९ पासून सातारा लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा राष्ट्रवादीचा आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी केली. तर नितीन भरगुडे पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी दाेन्ही मतदार संघाची जोरदार मागणी केली.
मुंबईत पार पडलेल्या चर्चेनंतर प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे म्हणाले की, येणाऱ्या चार ते पाच दिवसात महायुतीची बैठक होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील टडर संघातील उमेदवारीबरोबर कुणाला एकोणता मतदार संघ मिळेल हे स्पष्ट होईल, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे तटकरे यांनी म्हंटले.
साताऱ्याच्या ‘या’ नेत्याने केली आग्रही मागणी
मुंबईत पार पडलेल्या बैठकिस हजर राहिलेल्या नेत्यांमध्ये जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर हे देखील होते. यावेळी संजीवराजे यांनी सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी विचारांचा आहे. त्यामुळे हे दोन्ही मतदार संघ राष्ट्रवादीकडे रहावेत, अशी आग्रही मागणी केली.